पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।।श्रीरामसमर्थ।। १२. मेदवृद्धी - कारण - औषधे - मर्यादा - - मेद रक्तापेक्षा घट्ट असतो. त्याचा प्रवाहीपणा कमी असतो. रक्तवाहिन्यामध्ये ज्या ठिकाणी मेद साठतो तेथे रक्ताच्या प्रवाहात अडथळा येतो. एखाद्या ठिकाणी तो जादा घट्ट झाल्यास त्या भागातील रक्त पुरवठा क्षीण होतो. पायाच्या नसा फुगणे किंवा हृदयाच्या नसा निकामी होणे काहीही होऊ शकते. शरीरातील कोणत्याही भागावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. सुरूवातीला हा जादा असलेला आळशी मेद ज्या ठिकाणी स्नायूंची हालचाल कमी असते त्या ठिकाणी जमा होतो. पोट- ओटीपोट-कंबर येथील आकार वाढतात. अल्पसंख्य मेद बहुसंख्य झाला की जेथे जागा सापडेल तेथे ठाण मांडून चिकाटीने बसतो. सांध्यांमधील जागेला प्राधान्य देतो. त्यांना हालचाल करण्यास मज्जाव करतो. थोडी जरी हालचाल झाली तरी वेदना सुरू होतात. सांध्यावर सूज येते. त्यांचा वापर कमी होतो. शरीर कामचूकारपणा करते. त्याला आराम करण्याची सवय लागते. पोट मात्र रिकाम्या वेळात खायला मागते. तेही चांगलं- चुंगलं, स्निग्ध-गोड, उष्मांकाने परीपूर्ण, चविष्ठ असलेले काम कमी, खाणे जास्त आणि पचायची वानवा. हे चक्र सुरू होते. इतर प्रदेशातही मेद जमा होतो. वाढत जातो आणि मेदवृद्धी चक्राच्या पुढच्या प्रगत आवर्तनाला सुरूवात होते. एकूणच खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन होण्यासाठी योग्य आहार व व्यायामाची आवश्यकता असते. आपल्या स्थूल देहाचे पोषण अन्नामुळे होते. शरीराला शक्ती मिळते. धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ शरीराच्या माध्यमातून शक्य होतात. म्हणूनच शरीरासाठी अन्न हे परब्रह्म आहे. अन्न घेतले नाही तर आपले असणे पुढे सरकत नाही. आपण जे खातो-पितो तसे वागतो-बोलतो. शरीराला ऊर्जा देणारे एकमेव स्त्रोत, प्राणशक्ती व्यतिरिक्त, फक्त अन्न आणि अन्नरस आहेत. अन्नाचे पूर्ण पचन झाल्यावर शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, वीर्य या सप्तधातूंना शक्ती मिळते तेज प्राप्त होते. या अन्नरसातील ऊर्जेमुळे शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. अन्नातील औषधी तत्त्वांमुळे सर्व प्रकारचे मेदवृद्धीतून मुक्ती ७३