पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रोधक हा गुणधर्म सोडून ऊष्णता वाहकाशी मैत्री करावयास हवी. त्यासाठी आपल्या शरीराला अधिक प्रमाणात ऊर्जा म्हणजेच ऊष्णता स्वीकारण्याचे प्रशिक्षण द्यावयास हवे. आपल्या शरीरातील मेदाला ऊर्जेशी मैत्री करण्यासाठी मदत करावयास हवी. अग्नीची उपासना करायला सुरूवात करावयास हवी. निसर्गातील अग्नी व शरीरातील जठराग्नी दोन्ही सूर्यनारायणाचेच अवतार आहेत. सूर्योपासना नित्यकर्म म्हणून स्वीकारावयास हवी. कायिक सूर्योपासनेमध्ये सूर्यनमस्कार सर्वोत्तम साधना आहे. ती आपल्या सद्गुरूकडून, आत्मारामाकडून शिकण्यास सुरूवात करावयास हवी. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ मेदवृद्धीतून मुक्ती ७२