पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळालाच नाही, तो तसाच साचून राहिलेला आहे. शरीरचे वजन कायम ठेवण्यासाठी व्यायामाचा आधार न घेता फक्त आहारावर नियंत्रण ठेवलेले आहे. असे असेल तर त्याच्या शरीरतील मेदाचे प्रमाण अधिक आहे. ते आरोग्याला धोकादायक आहे. बॉडी- मास- इंडेक्स याचा प्रमाणित तक्ता कोणत्या देशातील लोकांसाठी आहे. त्या प्रदेशातील हवामान, निसर्ग, अन्नधान्य, उद्योग, लोकांची समृद्धी, खाण्या-पिण्याच्या सवयी, त्यांची उंची, वजन, हाडांचा आकार या आणि इतर निकषावर हा प्रमाणित तक्ता केलेला असतो. तो सर्वांनाच तंतोतंत लागू होत नाही. शरीरातील मेद वाढलेला आहे हे आपल्या सहज लक्षात येते. पोटाचा घेर आहे. कमरेवर मांस वाढल्यामुळे हालचाल मंदावली आहे. प्रत्येक वेळा आपले वजन केले की वजनाचा काटा याचीच साक्ष देतो. डॉक्टरही वजन वाढल्यामुळे हा त्रास आहे असे सूचवतात. आजारी माणसाचे वय व वजन याचा विचार करून आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. व्यायामास सुरूवात करा. सकाळी फिरायला जा हेही सांगतात. मेद वाढल्यामुळे शरीराच्या आकारात बदल होतो. शरीराची सगळ्या बाजुने सारखीच वाढ होते. शरीराचा आकार सर्व बाजुंने गोल होतो. दुसरा प्रकार - पोट- ओटीपोट-कंबर येथील मांस वाढते. तेथील आकार सफरचंदासारखा होतो. तिसरा प्रकार - कंबर-पाश्वर्भाग या ठिकाणचे मांस वाढते. हा आकार पेरूसारखा होतो. तिनही प्रकारात शरीराचे आकारमान वाढते, पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था यांच्या कार्यक्षेत्रात वाढ होते. मेदाची जादा असलेली घनता व उष्णता रोधक स्वभाव यामुळे त्यांच्या कामात अडथळे येतात. हे अडथळे आपोआप दूर होत नाहीत. शरीराचा व्याप वाढल्यामुळे श्वासावाटे मिळणारी ऊर्जा कमी पडते. ऊर्जा कमी पडल्यामुळे शरीरात सर्वदूर रक्ताचे शुद्धीकरण व्यवस्थित होत नाही. रक्ताची पत कमी होते. त्यामुळे अशक्तपणा- आळस - कंटाळा सुरू होतो. चलनवलन कमी होते. खाल्लेलं पचत नाही. सर्वच अवयव क्षीण झाल्यामुळे मनाची उभारी कमी होते. बुद्धीचे सहकार्य मिळत नाही. हे सर्व अडथळे पार करण्यासाठी मेदाची घनता कमी करणे आवश्यक आहे. ते प्रवाही करणे, रक्तकार्याला पोषक करणे गरजेचे आहे. यासाठी मेदाने आपला ऊष्णता मेदवृद्धीतून मुक्ती ७१