पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होतात. शरीरचे वजन कमी आहे म्हणून मेदाचे प्रमाण कमी, असे म्हणता येत नाही. या उलट शरीराचे वजन जास्त व चरबीचे प्रमाण कमी असले तर विकारांचे संकट कमी होते. शरीरातील मेद योग्य प्रमाणात ठेवणे म्हणजे आरोग्याची काळजी घेणे आहे. शरीरातील मेदाचे योग्य प्रमाण पुरूषांसाठी १०% - २५%, महिलांसाठी १८%-३०% असते. खेळाडूमध्ये हे प्रमाण कमी असते. वीस वर्षाच्या व्यक्तीमध्ये दर दहा वर्षांनी मेदाचे प्रमाण १ - ३% वाढते. साठ वर्षांनंतर ते हळू हळू कमी होते. वयस्कर व्यक्तीमध्ये दर दहा वर्षांनी साधारणपणे २% ने हाडांचे वजन घटते. याचाच अर्थ असा की एकाच वजनाच्या दोन व्यक्तींमध्ये मेदाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. शरीरातील मेदाची घनता शरीराच्या इतर स्त्रावांपेक्षा जास्त असते. तसेच मेद हा उष्णता रोधक आहे. या त्याच्या गुणधर्मावरून मेद मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती तयार झालेल्या आहेत. पाण्यामध्ये संपूर्ण शरीर बुडवायचे. जे पाणी बाहेर पडेल ते मोजायचे. असाच प्रकार किती वायू बाहेर पडला हे मोजून मेदाचे मापन केले जाते. इन्फ्रारेड किरण नसेतून आत सोडून, दोन प्रकारचे एक्सरे काढून, त्वचा चिमट्यामध्ये पकडून, अल्ट्रा साऊंडचा वापर करून इत्यादी प्रकाराने शरीरात असलेले मेदाचे प्रमाण बरोबर आहे किंवा नाही हे ठरविले जाते. बॉडी-मास- इंडेक्स (BMI) चा वापर सर्वसाधारणपणे प्रचलित आहे. शरीराचे वजन किलोग्राममध्ये, भागीले उंची मिटरमध्ये घेऊन त्याचा वर्ग जे उत्तर येईल तो त्या व्यक्तीचा बॉडी-मास-इंडेक्स. वजन किलोग्राम / (उंची मिटर) चा वर्ग) = बॉडी- मास-इंडेक्स. त्याचे प्रमाण योग्य आहे, उच्चांकी आहे का निचांकी आहे हे प्रमाणित तक्त्यावरून ठरवायचे. प्रत्येक पद्धतीमध्ये गुण-दोष आहेत. सर्वसाधारणपणे नियम असा की वयाच्या १८ ते २२ वर्षांपर्यंत असलेले वजन हे आपले आदर्श वजन समजावे. वजन व मेद यांचा संबंध असल्याने हे वजन कायम स्थिर राहीले की अनारोग्याची बाधा होणार नाही असा एक समज. वयाच्या साठाव्या वर्षी हेच वजन कायम ठेवलेले आहे. त्या व्यक्तीचे सर्व आयुष्य बैठे काम करण्यांमध्ये गेलेले आहे. व्यायाम, चालणे, खेळ यांची सवय शरीराला नाही. मेदाचा वापर केलाच नाही. तो मेदवृद्धीतून मुक्ती (90