पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। ११. मेदवृद्धी मापन व उपचार शरीरातील मेद या शब्दाचा अर्थ आहे चरबी, स्थूलपणा, मांस. इंग्रजी भाषेमधील फॅट, ओबेसिटी हे शब्द आपल्या चांगलेच परिचित आहेत. मेदाची वृद्धी होणे म्हणजे शरीरातील चरबी आणि मांस यांत वाढ होणे. मासामध्येच चरबी असते. कमी चरबीचे मांस किंवा जास्त चरबीचे मांस हे दोन प्रकार. त्यातही तर- तम भाव ठरविणे कठीण आहे. कारण त्यातील चरबी मोजता येणे हे वाटते तितके सोपे काम नाही. आपले शरीर पाणी, प्रथिने, खनिजे व चरबी यांनी बनलेले आहे. शरीरातील मांसल भाग दोन प्रकारात मोडतात एक चरबीयुक्त व दुसरा चरबीरहित. शरीरातील चरबीचेही दोन प्रकार आहेत. एक शरीराला आवश्यक असणारी चरबी व दूसरी शरीराला अपायकारक असणारी चरबी. एक शरीर कार्याला ऊर्जा देणारी असते दुसरी शरीरात साठलेली असते. ती स्नायूंची क्षमता क्षीण करणारी असते. हृदयामधील तसेच फुफ्फुसामधील चरबी, हाडामधील कूर्चा, यकृत, पित्ताशय, मृत्राशय, लहान-मोठे आतडे, सर्व स्नायू तसेच शरीरामधील सर्व मज्जारज्जुंचे जाळे यांच्यामध्ये असलेल्या मेदाला आवश्यक चरबी म्हणतात. चरबीचा साठा त्वचेच्या खाली व अंतर्गत अवयवांच्या भोवती असतो. शरीराचे संरक्षण व उष्णता रोधक म्हणून या चरबीचा उपयोग होतो. - शरीरातील चरबीच्या प्रमाणात चढ-उतार नेहमी चालूच असतात. शरीराचे वजन व चरबीचे प्रमाण जास्त झाल्यास सांध्यामध्ये सूज व हाडामध्ये दोष निर्माण होतात. त्यामुळे तीव्र वेदना सुरू होतात. तसेच मधुमेह, रक्तदाब, श्वसनविकार, हृदयविकार रक्तातील चरबी व कोलेस्ट्रल मधील वाढ इत्यादी धोके वाढतात. शरीराचे वजन कमी आहे म्हणून रोग विकारांचा धोका कमी, असे होत नाही. उलट भूक मंदावते म्हणून वजन कमी होते. मग आहार वाढवण्यासाठी पाचक औषधे व रेचक घ्यायचे. त्यामुळे अशक्तपणा व त्या अनुषंगाने इतर विकार सुरू मेदवृद्धीतून मुक्ती ६९