पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शरीराला अधिकाधिक प्रमाणात प्राणतत्त्व स्वीकारण्याचे प्रशिक्षण देणे हा एक कलमी कार्यक्रम दररोज राबवायचा आहे. सुरुवातीला हा एकसुरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम सहज-सोपा वाटतो. एकदा सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केली की त्यातील अडचणी लक्षात येतात. शरीरातील स्नायूंना अनेक त्रास सुरू होतात. अशावेळी आसनातील ताण दाब यांची वैशिष्ट्ये व प्रकार यांची उजळणी करा. यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की सापडेल याची खात्री बाळगा. काही अडचण असल्यास संस्थेशी संपर्क करा. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ मेदवृद्धीतून मुक्ती ६८