पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुभवता येतो. आसनातील शरीर स्थिती क्रमांक १. हाताच्या पंजापासून छातीवर २. पायांच्या घोट्यापासून हातांच्या बोटांपर्यंत ३. स्वाधिष्ठान चक्रापासून मणिपूर चक्रापर्यंत ४. कपाळा पासून मानेच्या चवथ्या मणक्या पर्यंत ५. मानेच्या तिसऱ्या मणक्यापासून पायांच्या घोट्यापर्यंत ६. मणिपूर चक्रापासून स्वाधिष्ठान चक्रापर्यंत ७. गुढघ्या पासून कपाळा पर्यंत ८. दोन्ही हाता-पायापासून कमरेपर्यंत ९. कपाळापासून मानेच्या चवथ्या मणक्या पर्यंत १०. स्वाधिष्ठान चक्रापासून मणिपूर चक्रापर्यंत ११. हाताच्या पंजापासून छातीवर १२. छातीपासून कपाळापर्यंत. आपण केलेल्या आसनामध्ये आपण घेतलेली आदर्श स्थिती पकडून ठेवायची आहे. थोडावेळ त्याच स्थितीत थांबायचे आहे. आसन करतांना ज्या कृती केलेल्या आहेत त्यातील कौशल्यांचा अनुभव शरीरावर घ्यायचा आहे. या स्थितीत शरीराचा तोल सांभाळत स्थिर- शांत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक आसनातील गुरूत्वमध्य कोणता आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. - ताण आणि दाब या संदर्भात आणखी एक महत्वाचे तत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे. ते म्हणजे आसनाचा उद्देश योग्य प्रकारे पूर्ण झालेला आहे किंवा नाही याचा पडताळा घेणे. प्रत्येक आसनातील उद्दिष्ट सिद्ध करण्यासाठी प्राणतत्त्व व ताण- दाब हे दोन प्रमुख घटक आहेत. अर्थात हे दोन्ही घटक परस्परावलंबी आहेत. त्याचबरोबर एकमेकांचे सहकारी आहेत. या दोघांनी मिळून केलेले कार्य शरीरावर कोठे व्यक्त होते आहे या कडे लक्ष देणे म्हणजे उद्दिष्टपूर्तीचा पडताळा पाहणे. हा पडताळा आसन पूर्ण झाल्यानंतर घ्यायचा आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे आसनातील उच्चतम स्थिती घ्या आणि शरीरावर अपेक्षित ठिकाणी ताण किंवा दाब व्यक्त होतो आहे याची खात्री करा. चूक असल्यास ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. हळू हळू सराव जसा वाढेल तशी या ताण- दाबाची तिव्रता वाढती ठेवा. प्रत्येक आसनात हा ताण किंवा दाब खालील प्रमाणे अनुभवास येतो. १. आसनातील शरीर स्थिती क्रमांक - १. छातीवर २. मान छातीवर ३. कंबर ४. कपाळ ५. मान ६. कंबर ७. ओटीपोट ८. मान, हातापायचे तळवे ९. कपाळ १०. पोट ११. छाती १२. छाती कपाळ. सूर्यनमस्कार घालतांना योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात ताण किंवा दाब देऊन मेदवृद्धीतून मुक्ती ६७