पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनाहन चक्र - हृदय, फुप्फुस, श्वासपटल, हात इत्यादी. - विशुद्ध चक्र – ७२,७२,७२, ७२७ शरीरातील नाड्या व सर्व अवयव. स्वाधिष्ठान - नाभीचे खालील सर्व अवयव. आज्ञा चक्र – कान, नाक, डोळे, डोके, श्वसन मार्ग, स्वरयंत्र, अन्ननलिका इत्यादी. मणीपूर चक्र - जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, प्लिहा इत्यादी. सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनात त्या त्या स्नायुपेशींना वैशिष्ट्यपूर्ण असा ताण-दाब मिळतो. त्यासाठी बाह्य उपकरणाची मदत घेण्याची गरज नसते. स्थूल शरीराची मदत घेऊन सूक्ष्मशरीरात खोलवर हा ताण-दाब प्रभावी पद्धतीने पोहचवायचा आहे. स्थूलातून सूक्ष्मात उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपले हात पाय व शरीरातील सर्व सांधे यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. एका ठिकाणी दिलेला दाब इतर स्नायुपेशींच्या मदतीने योग्य दिशेने प्रवास करून अपेक्षित ठिकाणी पोहचवायचा आहे. आपला उद्देश सफल होतो आहे याची प्रत्येक वेळी खात्री करायची आहे. चूक होत असल्यास ती दुरुस्त करायची आहे. ताण किंवा दाबाची सुरूवात आणि शेवट अशी दोन टोके असतात. ताण- दाबाचा प्रवाह सहज आणि सुकर होण्यारसाठी महामार्गाचा मागोवा घेत पुढे सरकायचे आहे. एखादा अडथळा आल्यास प्रवाह पुढे सरकत नाही. तेथेच थांबतो. जिरून जातो. ज्या ठिकाणी तो मुरतो तेथील स्नायू या प्रकारचा ताण दाब स्वीकारण्यासाठी सक्षम नसतात. तेथे वेदना सुरू होतात. यासाठी प्रत्येक प्रकारातील ताण दाबाच्या सुरूवातीचे व शेवटचे टोक याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हा ताण- दाबाचा प्रवाह सुखद होण्यासाठी त्याचा मागोवा घ्याचयचा आहे. त्याची सोबत करायची आहे. त्याला एकटा सोडायचे नाही. एकटा सोडला तर तो पडेल-कोठेही जाऊन धडक देईल, धडपडेल व आपल्यालाच असह्य वेदना होतील. आपण ज्या बाजूला शरीर वाकवतो त्याच्या विरूद्ध बाजूला मिळालेला ताण किंवा दाब स्वीकारायचा असतो. ज्या बाजुला वाकतो तो भाग मोकळा ठेवायचा असतो. साधारणपणे ताण किंवा दाबाचे शेवटचे टोक पकडायचे, स्वीकारायचे अनुभवायचे असते. पण काही आसनांमध्ये दोन्ही टोके पक्के पकडून ठेवायचे असतात. सूर्यनमस्कारातील प्रत्येक आसनाचा ताण किंवा दाब खालील प्रमाणे मेदवृद्धीतून मुक्ती ६६