पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपूर्ण मेरुदंड शरीरातील शक्तीपीठ आहे. हे शक्तीपीठ मजबूत करायचे आहे. मेरुदंडाची लवचिकता वाढवायची आहे. स्नायूंची ताकद त्यांच्या ताण-दाब सहन करण्याआच्या क्षमतेवर अवलंबून असते. हाच नियम मेरुदंडाच्या स्नायुपेशींना लागू पडतो. सूर्यनमस्कार करतांना हे मणके हालवायचे आहेत. नाचवायचे आहेत. छातीत हवाभरून श्वासाच्या तालावर व नादावर नाचायचे आहे. प्रत्येक आसनामध्ये कोणते मणके कार्यरत करायचे आहेत याकडे सावधपणे लक्ष द्यायचे आहे. मेरूदंड ही तेहतीस मणक्यांची माळ आहे. यातील सहा मणी विशेष महत्त्वाचे आहेत. यांनाच ऊर्जाचक्र म्हणून संबोधतात. या ऊर्जाचक्रावर ताण-दाब दिल्यास खालीलप्रमाणे मेरूदंड उत्तेजीत होतात. प्रभावित होणारे अनाहत चक्र - पाठीचे मणके क्रमांक - १ ते १२. • मानेचे मणके ०८, पाठीचे १२, . कमरेचे ०५, विशुद्ध चक्र- हाड ०३. स्वाधिष्टान चक्र - त्रिकास्थीकचे ०५, माकड हाड ०३. आज्ञा चक्र - मानेचे मणके ०१ ते ०८. .त्रिकास्थीचे ०५, माकड मणीपूर चक्र- त्रिकास्थीचे मणके ०५, प्रत्येक मणक्यातून असंख्य मज्जारजुंचे पुंजके बाहेर पडलेले आहेत. ते सर्व शरीरभर पसरलेले आहेत. मेंदुकडून आलेल्या सूचना संबंधित अवयवांपर्यंत पोहचविणे व त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेणे हे त्यांचे प्रमुख कार्य. शारीरिक-मानसिक-प्रतिक्षिप्त या सर्व प्रकारच्या क्रिया यांच्या मार्फतच पूर्ण होतात. मेरुदंडाला असलेला नैसर्गिक आकार थोडा जरी बदलला तरी मणक्यातून निघालेल्या संदेश वाहिन्यांवर ताण-दाब पडतो. संदेश वहनाचा मार्ग संकुचित होतो. पर्यायाने मज्जारज्जुंच्या कार्यावर परिणाम होतो. त्यांच्या कक्षेतील स्नायुपेशिंची कार्यक्षमता कमी होते. स्नायुपेशींचे अवयव दुबळे होतात. आळशी होतात. शरीरातील जोम-उत्साह - ताकद कमी होते. आरोग्य व आनंद यावर विपरित परिणाम होतो. सूर्यनमस्कार घालतांना कोणत्या मणक्यांच्या संपर्कातील कोणते अवयव सशक्त करायचे आहेत या कडेही लक्ष द्यायचे आहे. प्रभवित होणारे अवयव - मेदवृद्धीतून मुक्ती ६५