पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही तयार स्थिती काय आहे? ती बरोबर घेतली आहे किंवा नाही? चूक झाली असल्यास ती नेमकी कोणती? वगैरे प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच शोधायची आहे. ही शरीरातील स्नायूंची तैयार स्थिती आतून घ्यायची आहे. तिचे चढ- उतार, चूक-बरोबर, किंवा तीव्रता दुसऱ्या व्यक्तीस समजणार नाही. कारण ती व्यक्ती तुमच्या शरीराच्या बाहेर आहे. ही तैयार स्थिती चूक आहे का बरोबर याचा संदेश त्या त्या आसनात लगेच तुमच्या शरीराला दिला जातो. तो ऐका. कोणत्या आसनात कोणती चूक झाली हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे त्या आसन कृतीमध्ये योग्य ती दुरुस्ती करा. चूक कुठे कोणती झाली हे लक्षात येत नसेल तर 'तैयार' स्थिती घेण्याचा प्रयत्न काही दिवस थांबवा. नंतर प्रथम गटातील चार 'तैयार' स्थितीचा सराव किमान एक आठवडा करा. तो व्यवस्थित जमतो आहे याची खात्री झाल्यावर पुढील गटातील चार 'तैयार' स्थितीचा सराव करण्यास सुरूवात करा. स्नायूंना आवडता खुराक देत, त्यांची परवानगी घेत, त्यांच्या मदतीने, दररोज हळू हळू प्रयत्न केले की 'तैयार' स्थिती सहज जमून जाते. प्रयत्नांती परमेश्वर ।। आसनाचे नाव त्या आसनाची तैयार स्थिती कोणती ते स्पष्ट करणारे असते. एकाच आसनाचे अनेक नावे आहेत. त्या-त्या नावाप्रमाणे त्यांची काठीण्य पातळी, कौशल्ये आणि आसन करते वेळी घेण्याची काळजी वेगवेगळी असते. भुजंगासन व धनुरासन एकाच आसनाची दोन नावे. पण एकापेक्षा दुस-यांची कौशल्य पातळी सरस आहे. काही आसनाची द्विरुक्ती आहे. पण त्यातील ताण- दाब वैशिषट्यपूर्ण आहेत. सूर्यनमस्कारातील आपली प्रगती लक्षात घेऊन शरीराला झेपेल इतपतच ताण / दाब देण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्रास होणार नाही. साधना खंडित होण्याचा धोका राहणार नाही. सूर्यनमस्कारात स्थिरता येईल. हळू हळू साधनेत प्रगती होत राहील. सर्व काळजी घेऊनही काही त्रास झाला तर संस्थेशी संपर्क साधा. सूर्यनमस्कार साधना खंडीत होणार नाही, यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। मेदवृद्धीतून मुक्ती ६१