पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकवाक्यता आहे. त्या परस्पर पूरक आहेत. एकमेकांना सहाय्य करणाऱ्या आहेत हे स्पष्ट होईल. एकामध्ये शरीर शुद्धी करण्याचे सामर्थ्य आहे तर दुसऱ्यामध्ये शरीर वृद्धी करण्याची शक्ती आहे. यासाठी दररोज १२+०१ सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता असेल तर चौथा-आठवा-बारावा असे तिनच सूर्यनमस्कार नियंत्रित गतीने काढावेत हा संकेत आहे. प्रत्येक आसनातील तयार स्थिती म्हणजे त्या आसनातील उच्चतम स्थिती. आपल्या शरीर क्षमतेप्रमाणे ही आदर्श स्थिती घ्यायची. या आसनाचा संकलित परिणाम शरीरावर स्वीकारायचा. हा परिणाम सुखद असेल तर उत्तमच, नसेल तर चूक नेमकी कोणती याचा मागोवा घ्यायचा. नंतरच्या सूर्यनमस्कारात ही चूक दुरुस्त करायची याची खुणगाठ बांधायची. त्यानंतर पुढचे आसनास सुरूवात करायची. ही चूक पहिल्या गटातील चार कौशल्ये किंवा तिस-या गटातील चार कौशल्ये यामध्ये असू शकते. प्रत्येक आसनातील तैयार स्थिती या कौशल्याचे स्पष्टीकरण दुसऱ्या गटातील चौथ्या क्रमांकाच्या कौशल्या मध्ये आलेले आहे. प्रत्येक आसनातील तयार स्थिती खालील प्रमाणे- १. प्रणामासन - हनुमंत उडी घेण्यासाठी सज्ज. २. ऊर्धहस्तासन - घणाचा घाव घालण्यासाठी सज्ज. ३. हस्तपादासन – महिषासुरावर झेप घेण्यासाठी सज्ज. ४. अश्वसंचालनासन - लगाम ढिला झाल्यावर धावण्यासाठी सज्ज. मकरासन • महाकाय मगर पुढील पाऊल टाकण्यासाठी सज्ज. साष्टांगनमस्कारासन - समान वायुची अन्नभट्टी कार्यरत होण्यासाठी सज्ज. भूजंगासन - छातीत हवा भरून डमरूच्या तालावर नाचण्यासाठी नागराज - सज्ज. ८. - पर्वतासन - पर्वत शिखराचे आकाशातील अनंताशी अखंड अनुसंधान ९. अश्वसंचालनासन - लगाम ढिला झाल्यावर धावण्यासाठी सज्ज. ५. ६. ७. - १०. पादहस्तासन - सर्व विकारांवर हल्ला करण्यासाठी सज्ज. ११. प्रणामासन - हनुमंत उडी घेण्यासाठी सज्ज. - १२. प्रणामासन व नमस्कार मुद्र- ज्ञान-समर्पण-वैराग्य. मेदवृद्धीतून मुक्ती ६०