पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असली तरच तेरा आठवड्याच्या कालावधी नंतर फत तीन सूर्यनमस्कार वाढवायचे आहेत. प्रत्येक आसनातील ‘तैयार' स्थिती त्या आसन कृतीचा उचांक आहे. ही 'तैयार' स्थिती घेतांना स्नायूंच्या ताकदीचा यथायोग्य वापर करत ही कृती करायची आहे. स्नायूंना ताठरपणा आलेला असल्यास त्यांना झेपेल इतपतच ताण-दाब द्यायचा आहे. या 'तैयार' स्थितीचा अनुभव शरीराच्या आत असलेल्या स्नायूंना येणार आहे. कारण ती शरीरातील अंतरस्थिती आहे. तिचे बाह्य स्वरूप अव्यक्त असले तरी शरीरातील संपूर्ण मांसपेशींची ताकद आतून वाढविण्याचे सामर्थ्य या 'तैयार' स्थितीमध्ये आहे. मांस पेशींची ताकद त्यांच्या ताण - दाब सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. सूर्यनमस्काराचा सराव जसा वाढेल तशी स्नायूंची लवचिकता वाढते. त्यांची ताण-दाब सहन करण्याची ताकद वाढते. ही ताकद चढत्या श्रेणित ठेवण्याचे श्रेय अधिकाधिक स्नायुंपेशींचा सहभाग, त्याची लवचिकता आणि आसनातील श्वास प्रणाली यांचेकडे जाते. नियंत्रित गतीने सूर्यनमस्कार घालतांना 'तैयार' स्थितीकडे जाणिवपूर्वक लक्ष द्यायचे आहे. ही ‘तैयार’ स्थिती आसनातील अत्तुच्य स्थिती असल्याने अर्थातच तिची काठीण्य पातळी अधिक आहे. ही स्थिती घेतांना सावध प्रयत्न करणे गरजेचे आहे. धावपळ करत. घाईगर्दीने ही क्रिया करणे शरीराला घातक ठरू शकते. स्नायूंचे दुखणे सुरू होणे, लचक भरणे, स्नायू तुटणे, मांस फाटणे वगैरे त्रास सूरु होण्याचा धोका लक्षात घेऊन सावकाश कृती करा. जमेल तशी आणि शक्य होईल तेवढीच कृती करा. आपलं वय व वजन यांची संमती घेउनच 'तैयार' स्थितीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा. हा धोक्याचा लाल दिवा सूर्यनमस्कार अवघड आहेत हे सांगण्यासाठी किंवा तुम्हाला घाबरविण्यासाठी दाखवत नाही. तुमचा सावध प्रयत्न अधिक सावधान पूर्वक व्हावा यासाठी माझा हा फक्त एक सावधानतेचा ईशारा आहे. साधनेत तसेच संसारात 'सावधान' असणे विशेष महत्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. येवढेही करून बेसावध असनांना चूक झालीच तर पुढचे किमान तीन सूर्यनमस्कार झटपट घाला. झालेली चूक काही त्रास न होता, तुमच्याही नकळत सुधारली जाईल. सूर्यनमस्काराची नियंत्रित गती व नैसर्गिक गती दोघांमध्ये मेदवृद्धीतून मुक्ती ५९