पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। ९. आसनातील तैयार स्थिती = ३०० सूर्यनमस्कार घालण्याचा उद्देश शरीराची शुद्धी करून सर्वांगीण विकास करणे असा दुहेरी आहे. शरीर शुद्धीसाठी संथगतीने सूर्यनमस्कार घातले जातात. प्रत्येक आसन साधारण पंचवीस सेकंदामध्ये पूर्ण करायचे म्हणजे १२ x २५ सेकंद, म्हणजे पाच मिनिटामध्ये एक सूर्यनमस्कार घातला जातो. जशी क्षमता असेल त्याप्रमाणे एक मिनिट ते दहा मिनिटे असा याचा कालावधी असू शकतो. ते सूर्यनमस्काराचा नैसर्गिक वेग चार श्वासात एक असा आहे. साधारणपणे एका मिनिटात ३-४ सूर्यनमस्कार घालता येतात. यापेक्षा अधिक वेळ एका सूर्यनमस्काराला लागत असल्यास तो नियंत्रित गतीचा सूर्यनमस्कार समजावा. नैसर्गिक वेग, नियंत्रित गती आणि संथ गती या प्रत्येक प्रकारात आसन संपल्यानंतर थोडं थांबायचे आहे. आसनाचा उद्देश - महत्व - ताण / दाब यांचा अनुभव घ्यायचा आहे. हा अनुभव तेरा आयामामध्ये जसा जमेल तसा घ्यायचा आहे. सूर्यनमस्काराचे तारक त्रयोदश गुणविशेष आहेत. ते जीवनदाई आहेत. याचा सुखानंदकारी अनुभव शरीराला मिळाला नाही तर समजायचे आजची सूर्यनमस्काराची भट्टी जमलेली नाही. उद्दिष्ट फलद्रुप झालेले नाही. येवढेच नव्हे तर ताण-दाब देण्यामध्ये काही चूक झाली असल्यास स्नायूंचे दुखणे सुरू होते. दुसऱ्या दिवशी सूर्यनमस्कार घालता येत नाहीत. साधना खंडित होते. तारक त्रयोदश गुणविशेष एक ते तेरा अंकामध्ये मोजता येतात. पण वेगवेगळे नाहीत. ते एकत्र आहेत. विभक्त नाहीत. या सर्व गुणविशेषांची सामुहिक शक्ती एकत्रितपणे कामाला लागली की सूर्यनमस्काराचा प्रभाव शरीर-मन- बुद्धीवर होण्यास सुरूवात होते. पण या तेरा गुणविशेषांचा सराव प्रत्येक सूर्यनमस्कारात प्रत्येक आसनात प्रत्येक वेळी करता येणे शक्य होईलच असे नाही. यासाठी सूर्यनमस्काराची सुरूवात ४+४+४+०१ असा गट पाडून प्रत्येक गटाच्या गुणविशेषांचा सराव करायचा आहे. वर्षाचे शेवटी सूर्यनमस्काराचे एक आवर्तन (२४+०१ सूर्यनमस्कार) हे लक्ष गाठायचे आहे. त्यानंतर शरीर क्षमता मेदवृद्धीतून मुक्ती ५८