पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

35 मी एक सूर्यनमस्कार साधक. साधनेत दररोज अनेक सूचना संदेश मिळतात. या सूचनांतूनच उपासना प्रकाशमय होते. प्रत्येकाचे वय, वजन, शरीरप्रकृती, मानसिक वृत्ती, व्यवसाय, साधनेतील अनुभव भिन्न असतात. मेदवृद्धीतून मुक्ती म्हणून पुस्तिकामध्ये दिलेल्या सूचना जेवढ्या झेपतील तेव्हढ्याच तारतम्याने स्वीकारा. साधनेमध्ये चूक आपली आणि ठपका मात्र शास्त्राला असे होऊ नये. सा व धा न आरोग्यासाठी प्रार्थना. आरोग्यं भास्करादिच्छेत् धनरिच्छेद् हुताशनात्। ज्ञानं महेश्वरादिच्छेत् मुक्तिमिच्छेज्जनार्दनात् ।। स्मृतिरत्नाकर, मत्यत्पुराण ६७/७१ श्लोकाचा अर्थ- आरोग्यासाठी सूर्यनारायणाची प्रार्थना करावी. धनासाठी अग्नीची, ज्ञानासाठी महेश्वराची तर मुक्तीसाठी विष्णूची प्रार्थना करावी. संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये दररोज. il ०५