पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेळा झाली की स्नायूंचे दुखणे सुरू होणार हे निश्चित. हे टाळण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत. संथ गतीने घातलेले सूर्यनमस्कार शरीर शुद्धीसाठी घातले जातात. नियंत्रित गतीने (मिनिट एक) काढलेले सूर्यनमस्कार शरीर वृद्धीसाठी घातले जातात. नियंत्रित गतीने काढलेल्या सूर्यनमस्कारामध्ये एखादी चूक अनवधानाने झाल्यास वेगाने काढलेल्या सूर्यनमस्कारामध्ये ती आपोआप दुरूस्त होते. सूर्यनमस्कारात बारा वैशिष्ट्यपूर्ण आसन स्थिती एकमेकात गुंफून एका लयित डौलदारपणे एक आवर्तन पूर्ण केले जाते. आसनातील गुरूत्वमध्य संभाळत, मिळणारा ताण- दाब स्वीकारत, स्नायुपेशींच्या सूचना घेत, आत्मारामाशी अनुसंधान ठेवत घातलेले सूर्यनमस्कार चित्तशुद्धी करतात. सूर्यनमस्काराची रोजची रोकडा प्रचिती दररोज देतात. सूर्यनमस्कार साधना दररोज अखंडितपणे सुरू राहावी, यथायोग्य पद्धतीची सवय शरीराला लागावी यासाठी पुढील चार आसन वैशिष्ट्यांचा समावेश दररोजच्या सरावामध्ये करावा. १. प्रत्येक आसनामध्ये ताण किंवा दाबाची सुरूवात कोठून होते व त्याचा शेवटचा बिंदू कोणता याकडे लक्ष देणे. २. प्रत्येक आसन करतांना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आसनाचा गुरूत्वमध्य कोठे आहे याकडे लक्ष देणे. ३. प्रत्येक आसन करतांना मेरूदंडावरील कोणते मणके कार्यरत होत आहेत याकडे लक्ष देणे. ४. या मणक्यांच्या कार्यकक्षेत कोण कोणते अवयव येतात याकडे लक्ष देऊन प्रत्येक आसन करणे. ५. आसनामधील विश्रांती स्थान दोन असतात पहिले अगोदर केलेल्या आसनाचा शेवट व दुसरे पुढील आसन करण्याची सुरूवात. यापैकी आपणाला सोईचे असलेले विश्रांती स्थान निश्चित करणे व त्याप्रमाणेच दररोज सराव करणे. - आपली साधना निर्दोष राहावी म्हणून आपण तारक त्रयोदश गुणविशेष बघितली. दररोज १२+०१ सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनातील या वैशिष्ट्यांकडे संपूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. पण प्रत्येक सूर्यनमस्कारातील प्रत्येक मेदवृद्धीतून मुक्ती ५६