पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनातील आदर्श स्थिती आपल्या क्षमतेप्रमाणे घेतल्यानंतर तैयार स्थितीमध्ये थोडं थांबणे हे या साधनेचे वैशिष्ट्य आहे. यामुळे शरीराला प्राणतत्त्वाचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो. शरीरातील संपूर्ण स्नायूपेशी ताणल्या जातात किंवा दाबल्या जातात. हे ताण आणि दाब पाच प्रकारचे आहेत. शरीराचा किंवा शरीर अवयवांचा शिरोभाग स्थिर ठेऊन अधोभाग ताणायचा, दुसरा प्रकार आहे अधोभाग स्थिर ठेऊन शिरोभाग ताणायचा, याचप्रमाणे दाबाचे दोन प्रकार आहेत. पाचवा प्रकारात ताण किंवा दाब दिलेले स्नायू सोडून इतर सर्व शरीर मोकळे ठेवणे. हे पाचही प्रकारचे ताण / दाब शरीरातील सर्व पेशींना प्रत्येक सूर्यनमस्कारात किमान एकदा तरी मिळतात. (०१ सूर्यनमस्कार बारा शरीरस्थिती ०५ प्रकारचे ताण दाब x १२ = शरीरावर ताण - दाब.) ६० वेळा - प्रत्येक पेशी जेंव्हा ताणली किंवा दाबली जाते तेव्हा त्यामधील विजातीय अनावश्यक द्रव बाह्य आवरणा जवळ येतो. पेशीमध्ये अधिक प्रमाणात प्राणतत्त्व जमा झाले की हा विखारी द्राव पेशीआवरणा मधून बाहेर ढकलला जातो. ती शुद्ध स्वच्छ होते. तिची लवचिकता वाढते. स्फूरण पावणे सशक्त होते. शरीरातील जास्तीत जास्त पेशी जोमाने कामाला लागल्यावर रोग-व्याधी-व्यसन यातून सहजपणे मुक्तता मिळते. दररोज किमान बारा + एक सूर्यनमस्कार पद्धतशीरपणे घातले तर शरीरातील प्रत्येक स्नायूपेशीला या प्रकारचा ताण दाब अनेक वेळा मिळतो. त्याचा प्रभाव शरीर-मन-बुद्धीवर सारख्याच प्रमाणात होतो. प्रत्येक पेशी प्राणतत्त्वाने प्रभावित झाल्यामुळे सर्व शरीर संस्था व अवयवांचे नियत कार्य उत्साह व आत्मविश्वास आणि ताकदीने सुरू होते. सूर्यनमस्कार साधनेची रोकडा प्रचिती दररोज अनुभवता येते. या सुखद अनुभूतीची प्रचितीच आपली उद्याची साधना निश्चित करते. तुमच्या कडून ती करून घेते. या पद्धतीने सूर्यनमस्कार घातले तर सूर्यनमस्काराची सर्व गृहित तत्त्वे आपल्या शरीरावर सिद्ध होतात. साधनेचे सर्व फायदे मिळण्यास सुरूवात होते. संथ गतीने घातलेले सूर्यनमस्कार मन एकाग्र करून घालणे आवश्यक आहे. सगळे आसन विशेष लक्षात घेऊन प्रत्येक शरीर स्थिती घ्यायची आहे. त्यातील एखादा भाग दुर्लक्षित झाला तर आसन करण्यामध्ये चूक होणार. ही चूक दोन-चार मेदवृद्धीतून मुक्ती ५५