पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योग्य पद्धतीने प्रयत्न केल्यास शरीराच्या आतपर्यंत, खोलवर पोहचता येते. सूक्ष्म शरीर प्राणचैतन्याने प्रभावित करता येते. प्रत्येक स्थूल अवयवाला सूक्ष्म अवयवाचा आधार मिळतो. डोळा हा स्थूल अवयव व ज्या प्रणालीमुळे दृष्य दिसते ते सूक्ष्म अवयव. सूक्ष्म अवयव डोळ्यांना दिसत नाहीत पण त्याची जाणीव आपल्याला नेहमीच असते. म्हणूनच पाय आहे पण चालता येत नाही किंवा कान आहे पण ऐकू येत नाही अशा व्यक्ती आपण पाहतो. सूक्ष्म अवयव प्रभावित करण्यासाठी सावकाश प्रयत्न करणे गरजेचे आहे. आसन कृतीमध्ये मन एकाग्र करून शरीरातील विशिष्ट भागावर ताण किंवा दाब द्यायचा आहे. तो हळू हळू वाढवायचा आहे. हा दाब त्या अवयवावर, त्यावरील मांसल भागावर, प्रत्येक मांस पेशीवर, पेशीमधील अणू केंदावर आणि रेणू- परमाणूंच्या भ्रमण कक्षेपर्यंत पोहचवायचा आहे. त्यासाठी प्राणतत्वाचा आधार घ्यायचा आहे. या दाबाची खोली व तीव्रता हळू हळू वाढविण्याचा प्रयत्न स्नायूपेशींच्या मदतीने करायचा आहे. या प्रकारच्या अतिरिक्त ताण- दाबाची स्नायूपेशींना सवय नसते. त्यांना हा दबाव अनधिकृत वाटतो. त्यांचा प्रतिकार सुरू होतो. त्या भागातील स्नायूंचे दुखणे वाढते. अशावेळी जादा कामाचा भार त्यांनी आनंदाने स्वीकारावा यासाठी स्नायुंची मनधरणी करावी लागते. त्यांना आवडत असणारा, अत्यावश्यक असलेला निर्णायक खुराव म्हणजे प्राणतत्त्व (प्राणवायू). या प्राणतत्वाचा अधिकात अधिक पुरवठा शरीराला होईल याकडे लक्ष द्या. हळू हळू प्रयत्न वाढवा. आपल्या शारीरिक कुवती प्रमाणे आसनातील आदर्श स्थिती घेतल्यानंतर पंचवीस सेकंद शरीर स्थिर ठेऊन हा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक आसन स्थिती घेतल्यानंतर थोडा वेळ थांबणे म्हणजे नियंत्रित गतीने सूर्यनमस्कार घालणे होय. हा जादा लागणारा वेळ सत्कारणी लागतो. स्नायूपेशींची मनधरणी करण्यासाठी वापरला जातो. त्यांची शक्ती वाढविण्यासाठी प्राणतत्त्वाच्या टॉनिकचा पुरवठा विपूल प्रमाणात केला जातो. श्रम करण्याची त्यांची कार्यक्षमता वाढविली जाते. सर्व स्नायूपेशी सूर्यनमस्कार साधनेत सामील होतात. स्नायुंची लवचिकता वाढते. सूर्यनमस्कार घालण्याचा आपला प्रयत्न सफल होतो किंवा नाही याचा पडताळा बघता येतो. मेदवृद्धीतून मुक्ती ५४