पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्काराचा दैनंदिन सराव सर्व रोग, व्याधी, विकार, व्यसन तसेच अकालमृत्यू यापासून मुक्ती देणारा आहे. जन्मोजन्मांतरीचे दारिद्र्य दूर करणारा आहे. हे सर्व सूर्यनमस्काराचे गृहित तत्त्व आहेत. अनादि कालापासून आपल्या मनाने हे सत्यतत्त्व स्वीकारलेले आहेत. मनातील या सत्यतत्त्वासहित आपला जन्म झालेला आहे. त्यातील सत्यासत्य शोधण्याचा प्रयत्न आपले मन करीत असते. त्यासाठी शरीराची मदत घेत असते. अपयश आले तरी आपण वारंवार प्रयत्न करीत असतो. या गृहित तत्त्वांची प्रचिती आपोआप येत नाही. त्यासाठी जाणिवपूर्वक पद्धतशीर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कारातील प्रत्येक शरीर स्थिती घेतांना इतर काही आसन वैशिष्ट्यांचा विचार केला पाहिजे. स्थूलाकडून सूक्ष्मापर्यंत जाण्यासाठी याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातील काही वैशिष्ट्ये आहेत- १. आसन स्तिथीमध्ये दिलेला ताण किंवा दाब शरीरावर कोठे व्यक्त होतो आहे याक़डे लक्ष देणे. सिद्ध करण्याचा प्रयत्न ३. प्रत्येक आसनामध्ये कोणते पंचमहाभूत कार्यरत करून शरीराला सशक्त करतो आहे याकडे लक्ष देणे. २. ४. ५. प्रत्येक आसन करण्याचा उद्देश लक्षात घेऊन करणे. त्या-त्या आसनातील (पंच) प्राण तत्त्व कोण कोणत्या अवयवांना प्राणऊर्जा देणार आहे याकडे लक्ष देणे. आपल्या शारीरिक कुवती प्रमाणे आसनातील आदर्श स्थिती घेतल्यानंतर पाचएक सेकंद शरीर स्थिर ठेवायचे आहे. यावेळी शरीराची असलेली तैयार स्थिती कोणती याकडे लक्ष द्यायचे आहे. सूर्यनमस्कारातून शरीराचे वजन कमी करणे हा उद्देश आहे. स्नायुंची लवचिकता वाढवून त्यांना सूर्यनमस्कारात सामिल करून घ्यायचे आहे. प्रत्येक आसनात ताण-दाब कोणत्या ठिकाणी, कोणत्या प्रकारचा, किती प्रमाणात आहे याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे सूर्यनमस्कार घालतांना स्नायूंवर पडलेल्या ताण- दाबाकडे लक्ष नसले तरीही दररोज सूर्यनमस्कार घातले जातात. पण अपेक्षित प्रगती होत नाही. आपला प्रयत्न उद्दिष्ठाधिष्ठित नसेल तर अपयश येणारच. मेदवृद्धीतून मुक्ती ५३