पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।।श्रीरामसमर्थ।। ७. सूर्यनमस्काराचा प्राण शरीरातील पेशींचे स्फूरण पावणे ही क्रिया जीवाच्या जन्मापासून सातत्याने सुरु असते. त्याला मर्यादा फक्त शेवटच्या श्वासाची. प्रत्येक स्नायूपेशींमधील अणू-रेणू-परमाणू यांच्या भ्रमण क्षेत्रात अवकाश आहे. पोकळी आहे. या शरीरांतर्गत असलेल्या अवकाशाचा संयोग बाह्य अवकाशाशी श्वासाच्या माध्यमातून आला की पेशींचे स्फूरण पावणे सुरू होते. हा पुरूष - प्रकृती, शीव- शक्ती, विष्णू- वैष्णवी यांचा संयोग आहे. घटाकाश व आकाश एकत्र आल्यावर शक्तीची निर्मिती होते. यालाच वैश्विक शक्ती किंवा प्राणतत्त्व म्हणतात. यालाच आत्माराम, चैतन्य, उर्जाशक्ती आणि इतर अनेक नावाने संबोधले जाते. व्यावहारिक दृष्ट्या यालाच आपण उत्साह, जोम, सामर्थ्य, ताकद आणि आत्मविश्वास या स्वरूपात प्रत्यक्ष ओळखतो. हे प्राणतत्त्व म्हणजेच सूर्यनमस्काराचा प्राण आहे. या प्राणतत्त्वाचा वापर करून आपले आरोग्य व आनंद अबाधित ठेवायचे आहे. विराट पुरूषाचा आत्मा किंवा विश्वात्मा म्हणजेच वैश्विक शक्ती. या वैश्विक शक्तीमुळे अवकाशातील सर्व ग्रह-गोल-तारे त्यांचे ठिकाणी स्थिर राहून आपापल्या कक्षेमध्ये ठराविक गतीने प्रदक्षिणा घालत असतात. स्वाधिष्ठान चक्राचे स्थान हे आपल्या शरीराचे आधारालय आहे. या आधारामुळे आपले शरीर एकाच आकारात बांधलेले राहते. शरीरातील सर्वपेशींचे अणू-रेणू-परमाणू त्यांच्या कक्षेत भ्रमण करीत असतात. वैश्विक शक्ती आणि स्वाधिष्ठान चक्र या दोघांचा संयोग सूर्यनमस्कारातून घडवून आणायचा आहे. आपण सर्व आदिशक्तीची प्रजा आहोत. आईच्या गर्भामध्ये हवेच्या माध्यमातून आपल्याला प्राणतत्त्वाचा खुराक सुरू होतो. हे प्राणतत्त्व आपली आदि-आई आहे. आपले कुलदैवत आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. यामध्ये यच्ययावत सर्व दैवीगुण-शक्ती संपदा एकवटलेल्या आहेत. सर्व मानव जातीचा हा वारसा आहे. आपल्या शरीरातील आदिआईच्या मायेची ही उब संपली की आपले मेदवृद्धीतून मुक्ती ४७