पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेथून आपल्या सर्व क्रियांचे (शारीरिक-मानसिक - प्रतिक्षिप्त) संचलन होत असते. या संचालनालयात परमश्रेष्ठी असलेला अध्यक्ष आहे. तो सूर्यनारायणाचेही संचलन करणारा आहे. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत पोहचायचे आहे. त्याचे सहस्त्रावधी दैवीगुण आहेत. ते सर्व दैवी गुण आपल्यामध्येही आहेत. त्यातील एखाद्या गुणाचा विकास करून त्याचे पर्यंत पोहचण्याचा एक महामार्ग म्हणजे सूर्यनमस्कार साधना. या महामार्गावरील दिशादर्शक आहेत शरीरातील ऊर्जाचक्रे त्यांचा लक्षवेध घेत सूर्यनमस्कारात प्रगती करता येते. अंतिम ध्येय गाठता येते. || आदित्याय विद्महे सहस्त्रकिरणाय धीमहि तन्नो सूर्य पचोदयात।। ॥जय जय रघुवीर समर्थ ।। मेदवृद्धीतून मुक्ती ४६