पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आस्तित्व थंड पडते. संपते. आपल्या कुलदेवतेचे कृपाछत्र अखंडित राहवे म्हणून नित्यनेमाने सूर्यनमस्कार घालायचे आहेत. प्राणतत्त्वाचा स्वीकार अधिक प्रमाणात करण्याचे प्रशिक्षण शरीराला द्यायचे आहे. शरीरामध्ये एकूण दहा प्रकारचे प्राण (वायू) आहेत. यापैकी पाच मुख्य प्राण आहेत. त्यांची नावे आहेत प्राण- अपान व्यान- उदान- समान पाच गौण प्राण आहेत. त्यांची नावे आहेत नाग, कुर्म, कूकल, देवदत्त, धनंजय. शरीरातील त्यांचे स्थान निश्चित आहे. त्याचे कार्य व कार्यक्षेत्रही निश्चित आहेत. तेच आपल्या शारीरिक व मानसिक क्रियांचे संचलन करत असतात. त्यांची ताकद अफाट आहे. अनंत आहे. वायू या शब्दाला प्रतिशब्द आहे शक्ती- सामर्थ्य. मरूत म्हणजेच वायू. म्हणजेच वायुपुत्र हनुमान. या मरुताची किंवा वायूची शक्ती काय आहे, किती आहे हे भीमरुपी स्तोत्रात वर्णन केलेले आहे. ते वर्णन आपल्या सर्वांना लागू पडणारे आहे. आपल्या मेरूदंडामध्ये असलेल्या शक्तीचेच हे वर्णन आहे. सूर्यनमस्कार शरीरातील अग्नी व प्राणामधील चैतन्याची पूजा आहे. मारुतीरायाची उपासना आहे. उपासना यामधील उप या शब्दाचा अर्थ जवळ असणे, सान्निध्य असणे. त्याच्या जवळ बसून अभ्यास करणे, सातत्याने प्रयत्न करणे, अभ्यास विषयाचे अनुसंधान चिंतन अखंडितपणे ठेवणे हा यशाचा सर्वोत्तम व सर्वात सोपा राजमार्ग आहे जशी अन्नाची जागा जठर आहे तशी श्वासाची जागा छाती आहे. घेतलेला श्वास फुफ्फुसात जमा होतो. त्यानंतर तो सर्व शरीरात पसरतो. तो शरीराच्या ज्या भागामध्ये जातो त्या प्रमाणे त्याचे वेगवेगळी नावे आहेत. पाच मुख्य प्राणाच्या स्थानाप्रमाणे शरीराची विभागणी करता येते. ते खालील प्रमाणे- १. प्राणाचे स्थान आहे श्वासपटल ते स्वरयंत्र. २. अपान वायूचे स्थान आहे नाभी पासून पायांच्या अंगठ्यापर्यंत. ३. व्यान वायूचे स्थान आहे संपूर्ण शरीर. ४. ५. ऊदान वायूचे स्थान आहे स्वरयंत्र ते शेंडी. समान वायूचे स्थान आहे श्वासपटल ते नाभी. प्रत्येक प्राणाचे कार्य आहे त्याच्या भागातील सर्व अवयवांना ऊर्जा पुरविणे, कार्यशक्ती पुरविणे. त्या त्या अवयवांकडून कार्य करून घेणे. सूर्यनमस्कारामध्ये ही मेदवृद्धीतून मुक्ती ४८