पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होतो. या चक्राचा अप्रत्यक्षपणे वापर स्थिती एक, अकरा, बारा ( प्रणामासन, प्रणामासन, प्रणामासन+मुद्रा) सोडून सर्व आसन स्थितीमध्ये केला जातो. शरीरातील याचे स्थान आहे मेरुदंडावरील शेवटचा मणका. अधिष्ठाधन म्हणजे आधार. हे चक्र आपल्या 'स्व'चा म्हणजेच आपल्या शरीराचा पायाभूत आधार आहे. यामुळे शरीरातील सर्व अवयव एका ठिकाणी व विशिष्ट आकारात बांधले जातात. शरीराला डौल व सौंदर्य प्राप्त होते. आपल्या शरीरात एकूण ७२,७२,७२,७२७ छोट्या मोठ्या रक्त वाहिन्यांचे जाळे आहे. त्यातील महत्वाच्या बहात्तर हजार नाडया या ठिकाणी एकमेकांना छेद देत सर्वशरीभर पसरलेल्या आहेत. स्व या शब्दाचा दुसरा अर्थ आहे आत्मा, जो परमात्म्याचे पूर्णरूप आहे. हा आत्मा शरीराच्या माध्यमातून कार्य करवून घेतो. शरीर नसेल तर आत्म्याचे अस्तित्व कार्यशून्य होते. संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आहे विराट पुरूषाचा आत्मा, म्हणजेच वैश्विक शक्ती. या वैश्विक शक्तीमुळे अवकाशातील सर्व ग्रह-गोल-तारे त्यांचे ठिकाणी स्थिर राहून आपापल्या कक्षेमध्ये ठराविक गतीने प्रदक्षिणा घालत असतात. हे 'स्व' (शरीराचे) चे अधिष्ठान व विश्वात्म्याचे अधिष्ठान एकच आहे आणि ते म्हणजे 'वैश्विक शक्ती'. या दोन्ही अधिष्ठानांचा संयोग या आसनामध्ये घडवून आणायचा आहे. स्वाधिष्ठान चक्राचे अधिष्ठान आहे जल तत्त्व. पृथ्वीवर जल व जमीन यांचे प्रमाण एकास तीन असे आहे. शरीरातील द्रव व घन पदार्थांचे प्रमाण साधारणपणे हेच आहे. शरीरामधील जल तत्त्वाचे महत्त्व लक्षात येण्यासाठी जठरामधील द्रव स्वरूपातील पोषक अन्न घटकांचे पचन कसे होते ते थोडक्यात बघू. घरातील सर्वजण जेवायला बसले आहेत. टीव्ही सुरू आहे. अचानकपणे टीव्हीवर अंत्यविधीचे दृष्य सुरू होते. रडणे-ओरडणे, सूड- दुःख या भावना प्रभावीपणे प्रसारित होतात. आपले मन व बुद्धी या भाव-भावनांनी भारावून जाते. अन्न स्वीकारणे व त्याचे पचन करणे या दोन्ही क्रियांकडे त्यांचे संपूर्ण दुर्लक्ष होते. स्नायूपेशींच्या तीन गती - - शरीरातील स्नायूमधे तीन प्रकारच्या गती असतात. पहिला प्रकार आहे सर्पासारखी गती. याचे उदाहरण म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया. अन्न मेदवृद्धीतून मुक्ती ४४