पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विशुद्ध चक्राचे अधिष्ठान अवकाश आहे. अवकाशामध्ये प्रणव उच्चार झाला आणि तेथून विश्वाच्या उत्पत्तीला सुरूवात झाली. या चक्राचा प्रभाव आपल्या वाचेवर आणि श्रवणेंद्रियावर होतो. आपले विचार कृतीमध्ये आणण्यासाठी मदत होते. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांचे सख्य वाढते. कान-तोंड - हात यांचे परस्पर सहकार्य व संतुलन वाढते. यामुळे सूर्यनमस्काराची संकल्पाना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते. विशुद्ध चक्राचे अधिष्ठान अवकाश आहे. म्हणूनच जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अधिकाधिक व्यापक होतो. मनाच्या कक्षा विस्तारतात, अमर्याद होतात. मन आकाशाएवढे मोठे होते. एखद्या वस्तूककडे किंवा व्यक्तीकडे संकुचित दृष्टीकोनातून बघितले तर आपल्या मनाच्या कक्षा अरुंद होतात. आपली वृत्ती कोती होते. आपण स्वार्थी होतो. जर आपण आपला दृष्टिकोन व्यापक करण्याचा प्रयत्न केला तर विशुध्द चक्र, मन-बुद्धीची मदत घेऊन मदतीला येते. आपल्या अंतःचक्षुची मर्यादा सूर्यमंडळाला भेदून शून्य मंडळात पोहचते. म्हणून सूर्यनमस्काराची कक्षा वाढविण्याचा प्रयत्न करा. हा फक्त व्यायाम प्रकार नाही तर एक साधना आहे. त्याला व्यक्तीगत मर्यादा घालू नका. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सूर्यनमस्कार शिकविणे हे आपले अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. जगातील प्रत्येक कुटूंब सूर्यनमस्कार साधनेचे व्यासपीठ व्हावे, त्यातील प्रत्येक सदस्य सूर्यनमस्कार कार्यकर्ता व्हावा यासाठी आपण जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. स्वाधिष्ठान चक्र स्थान व महत्त्व चक्राचा रंग- केशरी, चक्राचे स्थान - मणक्याचे शेवटचे टोक. चक्राचे अधिष्ठान- जल, शरीरावर परिणाम - आहारवृद्धी, गाढ निद्रा. प्रभावित अवयव - जीभ, मेंदू. स्वाधिष्ठान चक्राचा प्रत्यक्ष वापर शरीर स्थिती तीन आणि दहा- हस्तपादासन दोनदा आणि शरीर स्थिती सात - भुजंगासन एकदा असा तीन वेळा मेदवृद्धीतून मुक्ती ४३