पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शक्ती एकत्र येतात तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपण जे काम हातात घेतो ते यशस्वी होतेच होते. यासाठी याचा निर्देश गुरुतत्त्व किंवा गुरूस्थान म्हणून केला जातो. यातूनच श्रद्धेने व सातत्याने समंत्रक सूर्यनमस्कार घातले जातात. विशुद्धचक्र स्थान व महत्त्व चक्राचा रंग- धुरकट. राखाडी. स्थान- मानेवर. तिसरा मणका. चक्राचे अधिष्ठान - अवकाश. शरीरावर परिणाम- नाद आणि शब्द. प्रभावित अवयव - कान, स्वरयंत्र. विशुद्ध चक्राचा वापर शरीरस्थिती दोन, पाच, आठ अनुक्रमे उर्ध्व हस्तासन, मकरासन आणि पर्वतासन या तीन आसनांमध्ये केला जातो. इतर सर्वच आसनांमध्ये या चक्राचा अप्रत्यक्षपणे वापर केला जातो. हे शक्ती केंद्र आपल्या शरीराला तसेच मन-बुद्धिला विशेष शुद्धी देणारे चक्र आहे. हे चक्र मेरुदंडावर मानेतील तिसऱ्या मणक्यावर आहे. प्रत्येक श्वासात घेतलेले प्राणतत्त्व या ठिकाणी संकलित केले जाते. प्रत्येक अवयवाची जशी मागणी असेल त्या प्रमाणात प्राणतत्त्वाचे वितरण येथूनच केले जाते. प्रत्येक अवयवाची ही मागणी वेगवेगळी असते. तसेच परिस्थितीनुसार या मागणीमध्ये बदल होत असतात. • डोक्यावर हात ठेवा तेथे टाळूचा भाग उबदार लागेल. पण काखेत ही उब जास्त प्रमाणात जाणवेल. जेवण झाल्यावर पचन संस्थेकडे ऊर्जेचा अधिक पुरवठा केला जातो. डोक्यातील ऊर्जा वाढल्यास डोके दुखणे, केस गळणे, पांढरे होणे, चिडचिड वाढणे, स्मणरणशक्ती कमी होणे इत्यादी परिणाम दिसून येतात. पोटातली ऊर्जा म्हाणजेच जठराग्नी, तो कमी झाल्यास भूक कमी होते, अपचन होते, पाठ-पाय- गुडघे दुखतात, अशक्तपणा येतो इत्यादी अनेक त्रास सुरू होतात. जो शारीरिक व्याधीपासून मुक्त असतो तो आरोग्य संपन्न असतो. तो स्वस्थ म्हणजे स्व-स्थित असतो. त्याच्या चेहऱ्यावर तेज असते. याउलट रोग, व्याधी, व्यसन, विकार असलेला चेहरा काळजीमुळे व कुपोषणामुळे निस्तेज दिसतो. मेदवृद्धीतून मुक्ती - ४२