पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आज्ञाचक्र या मर्मबंधाला जगतज्योती, तिसरा डोळा ही इतर विशेषणे वापरली जातात. या ऊर्जाचक्राचा निर्देश ज्योत किंवा डोळा या प्रतिमेने केला जातो. हे ऊर्जाचक्र आपल्या शरीरातील प्राणतत्वाचा स्वीकार करणारे केंद्र आहे. प्राणवायू हा अग्नीचे प्रतिक आहे. कारण एका वाचून दुसऱ्याचे अस्तित्व शक्य नाही. सौम्य प्रमाणातील प्राणतत्त्वावर आपले जीवन अवलंबून आहे. शरीरात अग्नीतत्त्व नसले की ते थंड पडते. शरीराचे अस्तित्व संपते. पाण्यातून बाहेर काढलेला मासा तडफडून मरतो, कारण त्याच्या शरीराला तीव्र स्वरुपातील अग्नीतत्त्व सहन होत नाही. सूर्यनमस्कार सरावास सुरूवात केल्यावर अगदी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला साधनेची प्रचिती येते. शरीराला दिलेला ताण - दाब जाणवतो. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा / शक्तीचा शरीर स्तरावर अनुभव येतो. अर्थात हाच परिणाम मन आणि बुध्दीवर सुध्दा झालेला असतो. पण त्याचा अनुभव लगेच जाणवत नाही. आज्ञाचक्राच्या माध्यमातून मन आणि बुद्धिवर हा परिणाम होत असतो. हे शक्तीस्थान कार्यरत करण्यासाठी प्रत्येक सूर्यनमस्कारात तीन वेळा आपण प्रयत्न करतो. अश्वसंचालनासन करतांना दोनदा व बारावी शरीर स्थिती (प्रणामासन+नमस्कार मुद्रा) करतांना एकदा. ही शरीर स्थिती घेतांना आज्ञाचक्रावर मन एकाग्र करणे अनिवार्य असते. तुमचे अंतर्मन नेहमी काहीतरी सूचना, संदेश, संकेत देत असते. पण मी || या संकेतांशी सहमत होत नाही. सूर-असूर या दोघांमध्ये सारखे द्वंद सुरू असते. योग्य सूचना योग्य वेळी स्वीकारून योग्य पद्धतीने त्यावर कार्यवाही करणे आपल्याला जमत नाही. अयोग्य सूचना स्वीकारण्याचा हा परिणाम असतो. अपयश आल्यावर ही चूक लक्षात येते. पण वेळ निघून गेलेली असते. सूर्यनमस्कार साधनेतील प्रणव, श्लोक, मंत्र वगैरे आपले मन शांत व एकाग्र ठेवतात. सूर्यनमस्कारामध्ये मन एकाग्र झाल्या मुळे मनाचा चंचलपणा कमी होतो. त्याचे माकडचाळे थांबल्यामुळे त्याला विश्रांती मिळते. मानसिक ताण-तणाव थोडावेळ का होईना दूर राहतात. मन अधिक एकाग्र होते. एकाग्र झालेल्या मनाचे मनःसामर्थ्य अमर्याद असते. या मनःसामर्थ्याचा वापर बुद्धि करून घेते. ॥ स्व चा शोध घेण्यास सुरूवात करते. जेव्हा स्व आणि सामर्थ्य म्हणजेच शीव आणि मेदवृद्धीतून मुक्ती ४१