पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्याला पुढे चोवीस तास मिळतात. याचे अधिष्ठान वायू. मरूत म्हणजे वायू. तो शक्तीस्वरूप आहे. सामर्थ्यवान आहे. अनाहतचक्र प्राणशक्तीचे स्थान आहे. वायू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनाला स्थिर करण्यासाठी साधना, जप, ध्यान म्हणजेच कार्यसिद्धिसाठी पुन्हा पुन्हा अथक प्रयत्न, यशदायी परमेश्वराचे सतत स्मरण याची आवश्यकता आहे. मारुतीराया आपली छाती उघडी करतो. त्यामध्ये श्रीसीता-राम यांच्या मूर्ती दिसतात. आत्मारामाचा निवास या ठिकाणीच असतो. तो तेथे नसला म्हणजे सर्व संपले. हे चक्र म्हणजे छातीचा संपूर्ण भाग. छातीच्या चोविस बरगड्या असा आहे. अनाहत चक्राचा वापर शरीर स्थिती एक व अकरा ( प्रणामासन), आणि शेवटची बारावी स्थिती ( प्रणामासन + नमस्कार मुद्रा) यामध्ये केला जातो. अनाहत म्हणजे आघात न करता उत्पन्न झालेला ध्वनी. गर्भावस्थेत असल्यापासून हा नाद आपली साथ करतो आहे. वातावरणात असलेली वैश्विकशक्ती आपण श्वसनातून फुफ्फुसामध्ये घेतो. शरीरातील प्रत्येक पेशी, त्यातील अणू-रेणू, त्यातील अवकाश या वैश्विकशक्तीचा स्वीकार करतांना स्फूरण पावतात. प्रत्येक श्वासागणिक बाहेरील अवकाश व शरीरातील अवकाश यांचा संयोग होतो. या दोन्ही अवकाशांचा संपर्क अखंडपणे, सतत, आयुष्यभर चालू असतो. या वैश्विक शक्तीचे आपल्या शरीरातील महाद्वार आहे अनाहत चक्र. याच्या माध्यमातून शरीरातील चैतन्याची मात्रा वाढविणे आणि स्वस्थ, आनंदी होणे हा साधकाचा उद्देश असतो. अनाहत चक्र पकडणे फार सोपे नाही. चुकीचा ताण-दाब अयोग्य ठिकाणी दिला गेल्यास स्नायूंचे दुखणे सुरू होतात. योग्य पध्दतीने ताण-दाब दिल्यास श्वसन संस्था प्राण चैतन्याने सजग होते. प्रभावीपणे श्वसनाचे कार्य सुरू होते. आज्ञाचक्र स्थान व महत्त्व चक्राचा रंग- कमळाप्रमाणे पांढरा. चक्राचे स्थान- कपाळावर दोन भुवयांच्यामध्ये. चक्राचे अधिष्ठान- आकाश / मानस / चंद्रमा. शरीरावर परिणाम- विचार पध्दती, विचारांचा आवेग. • बुध्दि, मन. प्रभावित अवयव - मेदवृद्धीतून मुक्ती - - ४०