पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आसन करतांनाही मणिपूर चक्रावर अप्रत्यक्ष स्वरूपाचा ताण पडतो. मेदवृद्धीतून मुक्ती मिळविण्यासाठी शरीरातील जठराग्नीचे तेज वाढविणे गरजेचे आहे. त्याला प्रज्वलित करायचे आहे. त्यासाठी शरीरातील या अग्नीला ज्वलनासाठी अधिक प्राणतत्त्वाचा पुरवठा करायचा आहे. 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म'. या यज्ञामध्ये शरीरातील वायू आणि अग्नी यांच्या मार्फत शरीरातील (जादा) रक्ताचा, मेदवृद्धीचा बळी आदिशक्तीला द्यायचा आहे. शरीराचा जादा भार कमी करून कार्य क्षमता वाढवायची आहे. नित्यकर्म पूर्ण क्षमतेने करावयाची आहेत. प्रत्येक कृतीचा कार्यकारण भाव लक्षात घेऊन ती आत्मविश्वासाने करायची आहे. पोटामध्ये घेतलेले अन्न हे शरीर अवयवांना शक्ती ऊर्जा पुरविते. योग्य आहारातून स्थूल शरीराला मिळणारी शक्ती किंवा ताकद विकसित होते. स्थूल शरीराचा आधार मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्राचे अधिष्ठान पृथ्वीतत्त्व आहे. गर्भ एकवटण्याची प्रक्रीया या चक्रापासून सुरू होते. पृथ्वीवरील विविध प्रकारच्या अन्नातून स्थूल शरीराचे पोषण होते. यातून शरीर अवयवांचे वजन वाढते, मेद वाढतो. अनाहत चक्र स्थान व महत्त्व चक्राचा रंग - सोनेरी पिवळा. उगवत्या सूर्याचा. - चक्राचे स्थान – छातीमध्य. चक्राचे अधिष्ठान - वायू. शरीरावर परिणाम - स्पर्शज्ञान. प्रभावित अवयव - त्वचा आपल्या शरीरामध्ये वैश्विक शक्तीचा प्रवेश, वायूच्या माध्यमातून, याच चक्रामध्ये प्रथम होतो. वैश्विक शक्ती / प्राणशक्ती म्हणजेच आत्माराम, परमेश्वर. अनाहत चक्र जेवढे महत्वाचे तेवढेच ते पकडायला अवघड. हे ऊर्जाचक्र पकडतांना दुसरीकडे ताण-दाब मिळाल्यास तो भाग दिवसभर दुखतो. याचीच दुसरी बाजू म्हणजे योग्य पध्दतीने या ऊर्जाचक्राचा वापर केल्यास त्याचे फायदे मेदवृद्धीतून मुक्ती - ३९