पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मणिपूर चक्र स्थान व महत्त्व चक्राचा रंग- निळा. चक्राचे स्थान- नाभी केंद्र. चक्राचे अधिष्ठान - अग्नी. - शरीरावर परिणाम- डोळ्यांची दृष्टी, विचारांचा दृष्टीकोन. प्रभावित अवयव- - डोळे, मेंदू. मणिपूरचक्राला नाभी चक्र असेही म्हणतात. नाभीस्थान हे आपले शरीर घडविण्याचे आरंभ स्थान आहे. गर्भात असतांना नाभी चक्रातून जीवाला प्राणऊर्जेचा पुरवठा होतो. याचेच दुसरे नाव सूर्यचक्र असे आहे. या केंद्रातून असंख्य मज्जारज्जू सूर्यकिरणाप्रमाणे संपूर्ण शरीरात प्रकाशमान झालेल्या आहेत. या चक्राचे अधिष्ठान आहे अग्नी. आपल्या शरीरातील जठराग्नी सर्वात महत्वाचा. तो आपल्याला त्याच्या अस्तित्वाची आठवण दिवसातून किमान तीन वेळा करून देतो. हा जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो. अन्नातील पोषक द्रव्ये सर्व शरीरभर पाठवितो. या पोषक घटकांमुळे शरीराचे संवर्धन-संरक्षण होते. स्नायूंचे पोषण सतत व्हावे, त्यांना ऊर्जेची कमतरता भासू नये म्हणून ठराविक मध्यंतरानंतर वारंवार भूक, पचन व संवर्धन या प्रक्रियांचे आवर्तन आयुष्यभर सातत्याने सुरू असते. मणिपूर चक्राच्या अविश्रांत श्रमामुळेच आपण संपूर्ण आयुष्य जोम-ताकद, आनंद-उत्साह यामध्ये जगू शकतो. शरीरातील अग्नी तत्व थोड्या प्रमाणात जरी वाढले, ताप आला तर कोण धावपळ, केवढा खर्च, किती औषधे ? याचा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे. हे संकट टाळण्यासाठी आपल्या शरीरातील मणिपूर चक्राची (अग्नी तत्त्वाची) माहिती करून घेऊ. त्याचा उपयोग सूर्यनमस्कारामध्ये करून आपले नित्यकर्म अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक सूर्यनमस्कार घालतांना आपण तीन वेळा मणिपूरचक्राचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. हस्तपादासन करतांना दोन वेळा मणिपूरचक्राला सहज मिळालेला दाब हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा असतो. साष्टांग नमस्कारासन करतांना मात्र मणिपूर चक्राला प्रत्यक्षपणे ताण दिला जातो. भुजंगासनात पोटावर विशेष ताण पडतो. हे शक्तीस्थान पकडणे सहज शक्य होते. नंतरचे सातवे व आठवे मेदवृद्धीतून मुक्ती ३८