पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काढून घेतला तर इमारत कोसळते. त्याच प्रमाणे ऊर्जाचक्र शांत नसेल, स्वस्थ नसेल तर त्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व अवयव कोसळून पडतात. एखाद्याला डोळे आहेत पण तो पाहू शकत नाही किंवा पाय आहेत पण चालण्याची क्षमता नाही. अशी उदाहरणे आपण बरीच बघतो. या ऊर्जाचक्राचे स्वास्थ्य किंवा कार्यक्षमता त्याला मिळणाऱ्या प्राणतत्त्वावर अवलंबून असते. सूर्यनमस्कारातून त्यांना हा खुराक अधिक प्रमाणात मिळतो. तो मिळविण्यासाठी आपण त्यांना जाणिवपूर्वक मदत करायची आहे. सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनातील ऊर्जाचक्र चैतन्याने प्रभावित करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत. सूर्यनमस्कार ही साधना आहे. या साधनेची दीक्षा देणारा सद्गुरू आहे आपला जीवात्मा. त्याचे प्रतिनिधी या साधनेचे प्रशिक्षण आपल्याला देणार आहेत. या आत्मारामाचे प्रथम प्रतिनिधी आहेत शरीरातील ऊर्जाचक्र. त्यांचे इतर सेवक आहेत शरीरातील चोवीस न्यास केंद्र, अडतीस मर्मबिंदू बहात्तरकोटी बहात्तरलाख, बहात्तरहजार, सातशेसत्तावीस शीरा- नाड्या- मज्जारज्जू- केशवाहिन्या आणि शरीरामध्ये असलेल्या सर्व रक्तपेशी, मांसपेशी, स्नायूपेशी, अस्थीपेशी वगैरे. या सर्वांचे सहकार्य घेऊन सूर्यनमस्कार साधना आपल्या शरीरावर सिद्ध करायची आहे. सूर्यनमस्काराच्या सरावामध्ये शरीरातील सात ऊर्जाचक्रांपैकी पाच ऊर्जाचक्र कार्यरत होतात. मूलाधार चक्र मात्र शांत ठेवणे, तेथील स्नायू मोकळे ठेवणे, त्या स्नायूंवर ताण किंवा दाब येणार नाही याकडे लक्ष देणे हे सर्वात महत्वाचे. मूलाधार चक्राचा प्रत्यक्ष सहभाग सूर्यनमस्कारामध्ये होत नाही. सहस्त्राधार चक्राचे केंद्र शरीरात नाही. ते ऊर्ध्व दिशेला कोठेतरी आहे. या चक्राचे संचलन वैश्विक शक्ती करत असते. ही दोन ऊर्जाचक्र अध्यात्म मार्गातील किंवा कुंडलिनीशक्ती जागृत करण्याच्या प्रक्रियेतील महाद्वार आहेत. अर्थात शरीरातील इतर पाच ऊर्जाचक्र कार्यक्षम झाल्याशिवाय कुंडलिनीशक्ती जागृत करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. म्हणूनच आपण या पाच शक्ती केंद्रांची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू. मेदवृद्धीतून मुक्ती ३७