पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शरीरातील ९५% पेक्षा अधिक स्नायू - पेशी सूर्यनमस्कारामध्ये कार्यरत करावयाच्या आहेत. शरीरामधील अवकाश व बाहेरील अवकाश यांचा योग घडवून आणायचा आहे. शरीरामध्ये असलेल्या चैतन्याला अधिक प्रमाणात वैश्विक शक्तीचा पुरवठा करून प्रत्येक पेशी आतून, गर्भातून सशक्त करायची आहे. एखादे अंडे बाहेरून फोडले तर ते नष्ट होते. पण तेच अंडे आतून फुटले, उबवले तर त्यातून जीव निर्माण होतो. याच पध्दतीने सूर्यनमस्कारात शरीरातील पेशी सशक्त होतात व प्राण चैतन्याचे स्फुरण वृद्धिंगत होते. आपल्याला आरोग्य व आनंद याची प्रचिती येते. शरीरातील सर्व मांस-पेशी सहा मर्मस्थानांमध्ये विभागल्या आहेत. या मर्म स्थानाला ऊर्जाचक्र म्हणतात. या ऊर्जा स्थानातून सूर्याचे तेज, मायेची-ऊब- शक्ती-सामर्थ्य सर्व मांस पेशींना पुरविली जाते. या सौर ऊर्जेचा पुरवठा, तिचा वापर आणि पुन्हा पुरवठा हे चक्र सातत्याने सुरू असते. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू असते. हे सहा ऊर्जाचक्र मेरुदंडावर आहेत. मेरुदंडावरील प्रत्येक मणक्यातून असंख्य मज्जारज्जुंचे पुंजके निघतात. ते सर्व शरीरभर पसरतात. त्यांचे प्रामुख्याने दोन कामे आहेत. मेंदुकडून आलेले संदेश त्या-त्या अवयवापर्यंत पोहचविणे आणि दुसरे त्या संदेशाप्रमाणे त्या-त्या अवयवांकडून कार्य करविणे. म्हणूनच शरीरातील ऊर्जाचक्रे त्या-त्या भागातील अवयवांची शक्ती केंद्र आहेत असे म्हटले जाते. हे प्रत्येक केंद्र पंचमहाभूतांचे प्रथम प्रतिनिधी आहेत. यांच्याच सहकार्याने सूर्यनमस्काराच्या माध्यमातून मेरुदंडाची लवचिकता वाढविण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सूर्यनमस्कार पाच ऊर्जाचक्र आज्ञाचक्र विशुद्धचक्र स्वाधिष्ठानचक्र मेदवृद्धीतून मुक्ती प्रत्येक ऊर्जाचक्र त्याच्या अखत्यारितील सर्व अवयवांचा आधार आहे. त्या क्षेत्राचा अधिपती आहे. खांब ज्याप्रमाणे इमारतीला आधार देतो • मणिपूर चक्र त्याप्रमाणे ऊर्जाचक्र त्या-त्या अवयवांचे अधिष्ठान आहे. खांब स्तब्ध आहे, शांत आहे. तो काहीच करत नाही. पण तो जर ३६ अनाहत चक्र