पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार ही ब्रह्मकर्मांतर्गत असलेली नित्यकर्म स्वयंसाधना आहे. ही साधना म्हणजे स्थूल शरीर व सूक्ष्म प्राण चैतन्य यांची पूजा आहे. योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार घातले तर त्याची रोकडा प्रचिती साधकाला दररोज मिळते. कारण साधनेला धार्मिक आधिष्ठान असते. सूर्यनमस्कार एक धार्मिक विधी आहे. या धार्मिक साधनेचा शरीर व प्राणचैतन्य यावर होणारा परिणाम विलक्षण आहे. प्रत्येक जीव वस्तू पंचमहाभूतांची बनलेली आहे. या पंचमहाभूतांचे निसर्गातील व आपल्या शरीरातील गुणधर्म एकच आहेत. हाताच्या मुठीमध्ये विस्तव घेतला आणि काय आहे ओळखा? असे नाही म्हणता येणार. कारण निखारा जळणारा आहे. पाणी थंड आहे. अग्नीला शांत करणारे आहे. तसेच लवंग उष्ण आहे. वेलदोडा थंड आहे. यांचे हेच गुण पूर्वी होते आज आहेत आणि उद्याही तसेच राहतील. ते कालातित आहेत. शाश्वत आहेत. आपल्या शरीरात असणारा अग्नी व निसर्गातील अग्नी दोघांचे गुणधर्म एकच आहेत. ते म्हणजे खाणे, पिणे, झोप, विश्रांती व सर्व कार्यासाठी ऊर्जा देणे. वायुचे गुणधर्म आहेत - चलन, वलन, अकुंचन, प्रसरण व निरोध. आकाशाचे गुणधर्म आहेत- काम, क्रोध, लोभ, शोक, भिती. तसेच माझी-तुमची सर्वांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे खाणे-पिणे-झोपणे. सर्व जीव-वस्तूंचे नैसर्गिक गुणधर्म जे पूर्वी होते तेच आज आहेत आणि उद्याही तसेच राहतील. ते कालातित आहेत. शाश्वत आहेत. हे नैसर्गिक न्याय तत्त्व आहे. व्यक्ती आणि वस्तुचा धर्म म्हणजेच त्यांचा नैसर्गिक गुणधर्म. तो कधीच बदलणारा नसतो. तो इतिहास, भूगोल, संस्कृती यांच्या पलीकडे असतो. त्यात काही बदल होण्याची सुतराम शक्यता नसते. शरीरामध्ये असलेल्या पंचमहाभूतांच्या केंद्रावर योग्य प्रकारचा ताण-दाब, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने दिल्यास त्याच्या अधिपत्याखाली असलेले अवयव प्राणतत्वाने प्रभावित होतात. आपले कार्य अधिक चांगल्या प्रकारे करण्यास सुरूवात करतात. हेच सूर्यनमस्काराचे धार्मिक अधिष्ठान आहे. नैसर्गिक न्याय तत्त्व आहे. आपल्या शरीरातील पंचमहाभूतांचे गुणधर्म निश्चित आहेत. त्यांच्यातील संतुलन बिघडले की आपली प्रकृती बिघडते. त्यांच्यातील संतुलन पुन्हा प्रस्थापित कारण्यासाठी या पंचमहाभूतांचाच उपयोग करून घ्यायचा आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ३१