पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। ५. पंचमहाभूतात्मक शरीर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त पंचमहाभूते आहेत. आपल्या शरीरात पंचमहाभूतांव्यतीरिक्त दुसरे काहीच नाही. निसर्गामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यां पंचमहाभूतांचे स्थान निश्चितपणे सांगता येते. प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे स्थान आणि प्रकार अनेक आहेत. त्यांचा आकार व कार्याचा आवाका यानुसार त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. जलाशय, कालवा, नदी, सागर, पाणवठा, विहीर, डबके इत्यादी. त्याचप्रमाणे शरीरातील जलाला संज्ञा आहेत- रक्त, लाळ, मूत्र, घाम. शरीरात असणाऱ्या पंचमहाभूतांच्या केंद्राला उर्जाकेंद्र म्हणतात. वीर्य, जल हे पाचांपैकी एक पंचमहाभूत. भूत या शब्दाचा अर्थ आहे होणे, असणे, अस्तित्वात येणे इत्यादी. हे पाच भूते एकत्र आले की अस्तिवाची सुरूवात होते. या नियमाला स्वतः पंचमहाभूतेही अपवाद नाहीत. जल या पंचमहाभूतामध्ये पाण्याचे अधिक्य आहे व उरलेल्या चार पंचमहाभूतांचे प्रमाण अल्प आहे. त्यांचे प्रमाण बदलले की आगळा-वेगळा दुसराच पदार्थ निर्माण होतो. त्याचे नाव दुसरेच काहीतरी असते. या पाचांचे एकत्रीकरणाचे परस्पर प्रमाण अनेक, असंख्य, अनंत आहेत. त्यातून अगणित अविष्कार वेगवेगळे रंग-रूप - आकार- कार्य- वैशिष्ट्ये घेऊन निर्माण होतात. जन्माला येतात. त्याप्रमाणे त्यांची नावे बदलतात. जीवही अनेक प्रकारचे आहेत. प्रत्येकाची जात प्रकार आकार-नावे- स्वभाव किंवा रुप वेगवेगळी आहेत. प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे. त्याचीही जमात असते. वागण्या-बोलण्याची- पेहरावाची पद्धत वेगवेगळी असते. हे वेगळेपण पंचमहाभूतांमुळे आलेले आहे. पचमहाभूतांना सगुण करणारे, त्यांना वेगळेपण देणारी एकच शक्ती आहे. याच परमतत्त्वाने सूर्याला प्रथम गती दिलेली आहे. आपल्याला दररोज प्रत्यक्ष दिसणाऱ्या सूर्यनारायणाच्याही पलीकडे असलेल्या या परमेश्वराची पूजा आपल्याला सूर्यनमस्कारातून करायची आहे. सूर्यनारायण परमतत्वाचा प्रथम प्रतिनिधी आहे. त्याची पूजा म्हणजेच परमेश्वराची पूजा आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ३०