पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चैतन्य स्त्रोत आहे. हा प्रवाह सूक्ष्म शरीर-अवयवांचे पोषण करतो. कपाळ हे आज्ञाचक्राचे स्थान आकाश त्याचे अधिष्ठान आहे. आपल्याला आसमंतातून संदेश, सूचना, आज्ञा सदोदित येत असतात. आपल्या ज्ञानाची कक्षा व प्रगतीचे क्षीतीज रुंदावत असतात. ही आकाशस्थ ज्ञानस्पंदने गुरूकृपेने स्पष्ट होतात. त्याप्रमाणे वागण्याची उपरती होते. हे गुरूमुळे शक्य होते. म्हणून याला गुरूस्थान म्हणून संबोधतात. ही आणि इतर अनंत प्रकाची सूर्यस्पंदने शरीरभर अखंडपणे कार्यरत असतात. छातीची धडधड ऐकता येते. हृदयाचे स्पंदने कार्डिओग्राफमध्ये स्पष्ट होतात. नाडीचे ठोके मोजता येतात. तसेच प्रत्येक मासपेशी मधील या सूर्यस्पंदनांचा ताल - सूर-लय-आवाजाची तीव्रता लक्षात घेऊन शरीर संस्थांवर सौरऊर्जेचा झालेला परिणाम मोजता येतो. पचन- श्वसन - मज्जासंस्थांचे विकार स्पष्ट होतात. ते दूर करण्यासाठी औषधोपचार सुरू करता येतात. शरीराचे आरोग्य व मनाचा आनंद अबाधित ठेवता येतो. सूर्यापासूनच इतर ग्रह-गोलांचा जन्म झालेला आहे. साहजिकच सूर्यावरील स्पंदनांचा प्रभाव सर्व ग्रहांवर आहे. आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो आहोत. पृथ्वीवर असणारी सूर्याची स्पंदने आपल्या शरीरात आहेतच. या स्पंदनांच्या प्रभावामुळे आपल्याला आरोग्य व आनंद प्राप्त होतो. हा आरोग्यानंद अबाधित ठेवण्यासाठी आयुर्वेद शास्त्राचा विस्तार झाला. इतर ग्रह - गोल-तारे यावरील स्पंदनांचा परिणाम आपल्या मन-वर्तणूक - भाग्योदय यावर होतो. त्याचा अभ्यास करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा विकास झाला. नाडीपरीक्षा आपल्या नाडीचा यथायोग्य परिचय करून घेण्यासाठी सकाळची वेळ उत्तम. शांत झोप, पूर्ण विश्रांती, मन उत्साही आनंदित असतांना स्वतःची नाडी परीक्षा करा. उजव्या हाताचा पंजा आकाशाकडे ठेवा. कोपरा पासून पंजापर्यंत हाताला आधार द्या. डाव्या हाताचे तीन बोटे तर्जनी-मध्यमा- अनामिका उजव्या आंगठ्याच्या खाली एक इंच मनगटावर ठेवा. स्त्रीयांनी डाव्या हाताच्या मनगटावर ठेवा. शरीरात असलेले सूर्यस्पंदने नाडीचे ठोके मोजून निश्चित करता येतात. मिनिटाला किती ठोके पडतात ते मोजा. जेवण झाल्यावर, जीने चढून आल्यावर, झोप झाल्यानंतर, आजारपणात, खूप काळजी, भिती वाटत असतांना मेदवृद्धीतून मुक्ती २७