पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीरामसमर्थ ।। ४. सूर्य - स्पंदन प्रकृती चिकित्सा दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशीसास्याद्भासस्तस्य महात्मनः ।।१२।। तत्रैकस्थं जगत्कृत्स्त्नं प्रविभक्तमनेकधा । अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ||१३|| श्रीमद्भगवद्गीता, विश्वदर्शन योग, एकादशोऽ घ्यायः श्लोकाचा अर्थ- आकाशात सहस्त्रावधी सूर्यांचा एकदम उदय झाला असता जो प्रकाश प्रकट होईल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रभेची बरोबरी क्वचितच करील. ॥१२॥ पांडुपुत्र अर्जुनाने त्या वेळी अनेक प्रकारे विभागलेले संपूर्ण जगत त्या देवाधिदेव श्रीकृष्ण भगवंतांच्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. ।।१३।। हे सर्व विश्व - स्थूल-सूक्ष्म, दृष्य-अदृष्य, सजीव-निर्जीव- प्रकाशमय आहे. शरीरातील प्रत्येक मांसपेशी प्रकाशमय आहे. कुंडलिनी शक्ती जागृत होणे म्हणजे प्रत्येक मांसपेशी सौरऊर्जेने, प्राणस्पंदनांनी, ज्ञानचैतन्याने प्रभावित होणे. नाभीस्थान म्हणजे मणिपूर चक्र. या चक्राचे अधिष्ठान आहे अग्नी. अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश, म्हणजेच ज्ञानसूर्याची ऊर्जाशक्ती. पृथ्वीच्या गर्भात अग्नी आहे. जठरात असणाऱ्या या अग्नीकेंद्रातूनच जीवाला सर्व पोषक द्रव्ये मिळतात. सूर्याच्या किरणांप्रमाणेच नाभी केंद्रातून असंख्य रक्तवाहिन्या सूर्यप्रभेप्रमाणे शरीरात डोक्यापासून पायापर्यंत सर्वत्र प्रकाशित झालेल्या आहेत. ही सौरऊर्जेची स्पंदने आपले स्थूल शरीर सांभाळतात. छाती हे अनाहत चक्राचे स्थान आहे. वायू त्याचे अधिष्ठान आहे. वायू म्हणजे मरूत. म्हणजेच वायूपुत्र मारूती. हा अकरावा रूद्र आहे. शरीरात असलेल्या दहा प्राणांचे संचलन करणारा आहे. आकाशात तो जसा सर्वत्र आहे तसा शरीरातही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मांसपेशीमध्ये आहे. या वायुतील प्राणस्पंदने सूर्याचा मेदवृद्धीतून मुक्ती २६