पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाडीचे ठोके मोजा. नोंद करून ठेवा. नाडीचे मिनिटाला पडलेले ठोके, त्यांचा ताल-सूर-लय-आवाजाची तीव्रता याची नोंद ठेवा. सराव वाढवा. सर्प व जळू यांच्या सारखी वाकडी चालते ती वात नाडी. बेडूक, चिमणी यांच्या सारखी त्वरेने चालते ती पित्त नाडी. हंस, मोर, पारवा यांच्यासारखी मंद मंद चालते ती कफ नाडी. लावा व तित्तर पक्षाच्या चालीप्रमाणे थांबत थांबत चालायला सूरूवात करते ती सन्नीपात नाडी. हळू हलकी चाल थांबून झरझर चालते ती द्विदोषांची नाडी. वात-कफ-पित्त यापैकी दोन दोष दर्शविते. हा विकार काटेकोरपणे औषधे- पथ्य-सुश्रूषा केल्याने बरा होणारा असतो. शरीरात ताप असल्यास नाडी उष्ण असते. वेगाने चालते. चिंता, दुःख, भिती यामुळे नाडी क्षीण होते. (आकाश) रक्तादाब वाढल्यास उष्ण व जड होते. (वायू) आमयुक्त किंवा पचन विकार असल्यास खूपच जड होते. (अग्नी) स्वस्थानातून सुटणारी, थांबत थांबत चालणारी, फार क्षीण असणारी, फार थंड असणारी अशा चार प्रकारच्या नाड्या प्राणनाश करतात. - मुत्रपरीक्षा - सकाळची पहिली लघवी, प्रथम व शेवटची धार सोडून, काचेच्या पेल्यात गोळा करा. त्यामध्ये तेलाचा एक थेंब गवताच्या काडीने टाका. मूत्रात टाकलेला तेलाचा थेंब पसरला तर आजार गंभीर नाही. सहज बरा होणारा आहे असे दर्शवितो. मूत्रात टाकलेला तेलाचा थेंब तसाच राहिला तर आजाराची तीव्रता अधिक आहे पण औषधोपचार व सुश्रृशा याने बरा होणारा आहे असे समजावे. मूत्रात टाकलेला तेलाचा थेंब तळाशी जाऊन वर आला, त्यामध्ये छिद्र आले, काळे किंवा तांबूस झाले, तळाशी जाऊन वर आलाच नाही, किंवा तेल बिंदू वितळून मूत्रामध्ये विरघळला तर तिनही दोष बळावले आहेत, आजार असाध्य आहे असे समजावे. वातविकारात तेल बिंदू लगेच पसरतो. पित्तविकारात तेल बिंदू टाकल्यावर बुडबुडे येतात. मूत्र पीवळसर व उष्ण असते. कफविकारात मूत्र पांढरट दिसते. मेदवृद्धीतून मुक्ती २८