पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्ण होणे म्हणजे एका कल्पाचा अंत होणे. रात्र सुरू झाली की विश्वाचा प्रलय म्हणजेच ब्रह्मदेवाची निद्रा सुरू होते. ही जगबुडी ब्रह्मदेवाची निद्रा संपेपर्यंत टिकते. दिवस सुरू झाल्यावर विश्वाची निर्मिती होण्यास पुन्हा सुरूवात होते. कालचक्राचे हे चक्र आहे. हे एक अतिविराट मंडलच आहे. स्नायुपेशीतील अणू-रेणुची भ्रमण कक्षा हे सूक्ष्म मंडल व कालचक्राचे मंडल हे विराट मंडल. मंडलाची ही दोन टोके अतिसूक्ष्म व अतिविशाल या स्वरूपातील आहेत. या मंडलातून असंख्य मंडलांचे तरंग निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ श्वसन, भूक, तहान, निद्रा, भय, चिंता, शोक यांचे मंडल आपण अनुभवतो. ऊन- सावली, गार - गरम, सुख-दुःख, असणे-नसणे, ज्ञान - अज्ञान, चल अचल, खाली-वर, दिवस-रात्र, प्रकाश - अंधार, जन्म - मृत्यू इत्यादी द्वंव्द आपल्याला चांगले परिचित आहेत. धान्याची पेरणी कापणी, फुले-फळे, बीज - रोप, उदय- अस्त, सूर्य-चंद्र, उन्हाळा-पावसाळा, थंडी-गर्मी, पाऊस-वारा ही निसर्ग मंडले फेर धरून नाचत असतात. त्यांच्या नृत्यामध्ये आपणही सहभागी होत असतो. अतिप्रचंड वेगाने फिरणाऱ्या तप्त वायूचा गोल म्हणजे सूर्य. हे अगणित अग्नीकण महाशक्तीशाली लोहचुंबकाच्या प्रभाव कक्षेत, त्याच्याच भोवती वेगाने फिरत असतात. या प्रचंड वेगामुळे लोहचुंबकाची शक्ती अधिक वाढते. आकर्षणाचा आवेग, गतीचा वेग यामुळे ऊर्जा-उष्णतेचे तापमान वाढत जाते. महाबलशाली लोहचुंबक, अमर्याद वेग व सूर्य द्रव्यमानाचा अती प्रचंड दाब यातून सूर्यावर महाप्रचंड ऊर्जा तयार होते. सूर्यावरील अणुऊर्जेची स्पंदने सर्व विश्वात मंडलाचे स्वरूपात पसरतात. या सौरऊर्जा समुद्राची पत्येक लाट, प्रत्येक स्पंदन ब्रह्मांडाला घेरते. आपल्या कवेत घेते. आपणही ब्रह्मांडातील घटक आहोत. आपल्या शरीरातील प्रत्येक मांसपेशी, त्यातील अणुकेंद्र या सौरऊर्जेने प्रभावित झालेले आहे. ही उर्जा रुद्ररूपी तसेच शांतस्वरूपी आहे. या महाप्रचंड प्रकाश- लोहचुंबकाला ऊर्जा-गती- तेज देणाऱ्या शक्तीपुढे नतमस्तक व्हा. साष्टांग नमस्कार घाला. सूर्यनमस्कार सूर्यनारायणाची उपासना आहे. उपासना या शब्दाचा अर्थ आहे सेवा करणे, पूजा करणे, चिंतन-ध्यान करणे, अभ्यास करणे. थोडक्यात उपास्य देवते प्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करणे. सूर्यनमस्कार साधना करणे म्हणजे जड मेदवृद्धीतून मुक्ती २४