पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सदासर्वकाळ 'शेष' राहतो. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्यद पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।। या जगत्सृष्टीचे कारण असलेला निर्गुण-निराकार ब्रह्म पूर्ण आहे. हे जगतब्रह्मही पूर्ण आहे. पूर्ण परब्रह्मामुळे हे जगतब्रह्म प्रगट होते. प्रलयकाळात किंवा अज्ञानाचा नाश झाल्यावर हे जगतब्रह्म पूर्णब्रह्मामध्येज विलीन होऊन पुन्हा पूर्णब्रह्म शिल्लक राहते. निर्गुण-निराकार असलेल्या पूर्णब्रह्माची प्रत्येक कृती किंवा निर्मिती पूर्णब्रह्म स्वरूप आहे. आपण उच्छवासावाटे वापरलेले प्राणतत्त्व शरीराबाहेर टाकतो. शरीर मात्र पूर्णपणे निर्वात कधीच होत नाही. शरीरातून प्राण बाहेर गेल्याणवर एक प्रहरानंतर शरीर निर्वात होते. शरीरामध्ये शिल्लक असणाऱ्या या वायुला शेषवायू किंवा शेषप्राण असे म्हणतात. हाच शेषशायी भगवान. याचा निवास आपल्या अंतःकरणात आहे. त्याच्या हातात शंख-चक्र ही आयुधे आहेत. तुम्हास युद्धास प्रवृत्त करणे, प्रशिक्षण देणे, यश देणे, विजयवार्ता सर्वदूर प्रक्षेपित करणे यासाठी तो सदैव उत्सुक आहे. प्रत्येक स्नायूपेशींच्या केंद्रस्थानी अणू-रेणू आहेत. त्यांच्या मंडलाकृती भ्रमणकक्षेमध्ये हा केंद्र स्थानी आहे. हा महाप्रतापी आहे. अणूचे विघटन केले की अणुशक्ती निर्माण होते हे आपल्याला माहीत आहे. आपल्या मध्यवर्ती असणाराच आपले भरण-पोषण-संवर्धन-संचलन करतो. तोच आपला प्राण आहे. ‘पिंडी’ ते ब्रह्मांडी या न्यायाने ब्रह्मांडमंडलाचा आत्माही सूर्यनारायण आहे. वेगळ्या शब्दोमध्ये सांगायचे झाल्यास हा विश्वाचा प्राण आहे. याच्यामुळेच विश्वाचे भरण-पोषण-संवर्धन होते. म्हणून तो ब्रह्मांडनायक आहे. प्रत्येक स्नायूपेशींमध्ये असलेले हे मंडल व त्यामध्ये असलेले शक्ती-तेजाचे अस्तित्व आपण पाहिले. विश्वामधील हा एक सूक्ष्म मंडलाचा प्रकार झाला. आकाशात असंख्य सूर्यमाला आहेत. या सूर्यमाला व त्यातील ग्रह - गोल-तारे हे एक महाकाय मंडलच आहे. कालचक्राचे मंडल हेही एक विराट मंडलच आहे. श्रीमद् दासबोध यामध्ये समर्थांनी पंचप्रलयाचे वर्णन केलेले आहे. यामध्ये ब्रह्मांड प्रलयाचे वर्णन आलेले आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प किंवा सर्ग. ब्रह्मदेवाचा एक दिवस चार अब्ज बत्तीस कोटी वर्षांचा असतो. ब्रह्मदेवाचा दिवस मेदवृद्धीतून मुक्ती २३