पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केलेले आहे. यानंतर आवाहन प्रार्थनेत सूर्यनारायणाचे विशेषण आलेले आहे 'सवितृमंडल मध्यवर्ती'. सवितृ / सविता म्हणजे माता. जन्म देणारी आई. या विश्वव्याप्त चल- अचल सृष्टीचा आईच्या मायेने पालनकर्ता करणारा म्हणून या ब्रह्मांडनायकाला प्रथम प्रणाम केलेला आहे. हे शब्द आदित्य नारायणाचे सामर्थ्य दर्शविण्यासाठी वापरलेले आहेत. (प्रार्थनेतील इतर शब्द त्याच्या रूपाचे दर्शन घडवितात.) तसेच हे सामर्थ्य सर्वोच्च व सर्वव्याप्त आहे याकडेही निर्देश करणारे आहेत. या दोन शब्दांमध्ये अखील ब्रह्मांड एकवटलेले आहे. सूर्यः आत्मा जगतस्तस्थुषश्च ।। हेच वर्णन यामध्ये अभिप्रेत आहे. मंडल या शब्दाचा अर्थ आहे गोल किंवा वाटोळा आकार. ही आकाराची संकल्पना स्थैर्य, स्थिरता दर्शविते. आकार काय आहे कसा आहे हे सांगण्याचे काम हा शब्दच करतो. पण मंडल या शब्दामध्ये गती आहे. गतीला सुरूवात असते. जेथे सुरूवात आहे त्या ठिकाणी येऊनच तिचा शेवट होतो. पुन्हा तेथूनच सुरूवात होते. गतीची सुरूवात मंडलात होते आणि शेवटही मंडलातच होतो. मंडल या शब्दाला पर्यायी शब्द द्यायचा झाल्यास वर्तुळ हा देता येईल. गोलवर्तुळ, वाटोळे वेढे असे शब्दप्रयोग आपण नेहमी वापरतो. वर्तुळ, गोल, वाटोळे इत्यादी आकार म्हणजेच पूज्य किंवा शून्य. शून्यत्व अभाव दर्शविणारे चिन्ह आहे. शून्य हे प्रतिक गुण-भाव-स्थिती - वस्तू यांचा अभाव दर्शविते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचा निर्देशही शून्य म्हणूनच करतात. कारण त्याचा आकारही गोलाकार आहे. त्याला गती आहे. या गतीची सुरूवात कोठेतरी झालेली आहे. ती केव्हातरी संपणार आहे आणि म्हणून ते एक मोठे शून्य आहे. भिंगरीला गती दिली की थोड्यावेळाने ती थांबते. शून्य होते. भिंगरी संपते. लाकूड शिल्लक राहते. भिंगरीला गती देणारा मात्र लाकुडही संपले तरी तसाच कायम रहातो. शून्य हे नेहमी पूर्णच असते कारण गतीचा शेवट तिच्या आरंभ बिंदुमध्ये होऊन तेथूनच पुन्हा गतीचे पुढचे आवर्तन सरू होते. मंडलांचे आवर्तन म्हणजेच गती किंवा हालचाल असे म्हणता येईल. मंडलाचे आदि-अंत एकत्र आले की मंडल पूर्ण होते. मंडलाचे आवर्तन थांबले की गती थांबते. मंडलाचे अस्तित्व संपते. खाली शून्य राहते. हे गतीमंडल ब्रह्मगतीमध्ये विलीन होते. गती देणारा मात्र मेदवृद्धीतून मुक्ती २२