पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तापमान थोडे जरी कमी-जास्त झाले तरी केव्हढा हाहाकार माजतो. किती काळजी, किती चिंता, किती उपाय सुचविले जातात, किती योजना सूरू केल्या जातात त्याची गणना करता येत नाही. ही उपाययोजना दररोज अपेक्षित परिणाम करते किंवा नाही याची मोजपट्टी मात्र आपल्याकडे नाही. एकूणच सृष्टी चक्राची माहिती मिळविणे, त्याचे संकलन करणे, निष्कर्ष काढणे आणि त्याचा फायदा सर्व जीव-सृष्टीला होण्यासाठी प्रयत्न करणे हा सर्व शास्त्रांचा व शास्त्रज्ञांचा उद्देश असतो. भौतीक शास्त्राने दिलेली काही माहिती- सूर्य हा सूर्यमालीकेतील मध्यवर्ती व सर्वात मोठा तारा आहे. सूर्यमालीकेतील एकूण ग्रहांच्या द्रव्यमान (mass) येवढे म्हणजे ९९.०८% द्रव्यमान एकट्या सूर्याचे आहे. पृथ्वीच्या व्यासापेक्षा सूर्याचा व्यास १०९ पटीने जास्त आहे. या आकारात १०००,००० पृथ्वी बसू शकतील. . . ★ . . . + . सूर्याच्या पृष्ठभागावर १०,०००° फॅरनहिट (५, ५००° सेंटीग्रेड) अणुऊर्जा आहे. सूर्याचा मध्य भागावर २७,०००,०००° फॅरनहिट (१५,०००,०००° सेंटीग्रेड) अणुऊर्जा आहे. प्रत्येक सेकंदाला १००,०००,००० टन स्फोटकांची ऊर्जा सूर्यऊर्जेची बरोबरी करू शकेल. आकाश गंगेमध्ये (मिल्की-वे) १००,०००,००० पेक्षाही अधिक सूर्य आहेत. आपल्याला दिसणारा सूर्य हा त्यांच्या पैकी एक. तो आपली नभोमंडलातील भ्रमण कक्षा २५००० प्रकाश वर्षांत पूर्ण करतो. त्यासाठी त्याला साधारणपणे २५०० लाख वर्षे लागतात. सूर्य पृथ्वीपासून १४९,६००,०००कि.मी. अंतरावर आहे. प्रकाशाचा वेग सेकंदाला ३०३,००० कि.मी. आहे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहचण्यासाठी आठ मिनिटांपेक्षा थोडा अधिक वेळ लागतो. एक प्रकाशवर्षापेक्षा कमी असलेले अवकाश अंतर मोजण्यासाठी सूर्य- पृथ्वीमधील अंतर Astronomical Unit (AU) परिमाण म्हणून वापरले जाते. मेदवृद्धीतून मुक्ती १९