पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्याचे द्रव्यमान (mass) ७०% हायड्रोजन, २८% हेलियम, २% धातू असे आहे. सूर्याच्या एका भ्रमणाला २५.४ दिवस लागतात. . ● सूर्यकेंद्राला मिळणारा भ्रमणाचा वेग वेगातून उष्णता, त्यावरील धातू, द्रव्यमानाचा प्रचंड दाब यामळे सूर्यावर विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होऊन अणुचे विस्फोट होतात. + + . दोन हायड्रोजनचा संयोग दोन न्युट्रॉनशी झाल्यावर हेलियमच्या निर्मितीसह प्रचंड ऊर्जाशक्ती तयार होते. सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वाला, उष्णता, प्रकाश असतो. त्याच्याही पुढे प्रकाश अवकाशात हजारो किलोमीटर पसरलेली असते. सूर्य ग्रहणाचे वेळी या प्रकाश प्रभा पाहता येतात. सूर्याच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी समान तापमान नसते. त्यामुळे कमी- जास्त प्रभावाचे इलेक्ट्रो-मॅग्नेटिक भारित प्रवाह तयार होतात. या सौर वादळांचा प्रभावसुपूर्ण सूर्यमालेवर होतो. पृथ्वीवर ध्वनी प्रसारण व ऊर्जा निमिर्तीवर याचा परिणाम जाणवतो. २६ डिसेंबर २००४ साली त्सुनामीच्या वेळी भारतीयांनी हा परिणाम अनुभवलेला आहे. भौतिक शास्त्राप्रमाणे अध्यात्म हे शास्त्र आहे. जेथे भौतिक शास्त्र संपते तेथून अध्यात्म सुरू होते असे म्हणतात. प्राचिन काळी ऋषी-मुनींना ध्यानावस्थेत असतांना ज्ञान झाले. ते ज्ञान प्रथम मौखिक स्वरूपात एका पिढीतून पुढील पिढीत व नंतर लिखित स्वरूपात आपल्या पर्यंत पोहचले आहे. ज्ञान होणे म्हणजे प्रत्यक्ष प्रचिती येणे. त्याचा अनुभव येणे. इतरांचे ज्ञान आपल्या दृष्टीने फक्त माहिती असते. या माहितीचा प्रत्यक्ष अनुभव आला की त्याचे रुपांतर ज्ञानात होते. ध्यानावस्थेत असतांना ऋषी-मुनींना अंतःचक्षू समोर काही दृष्य दिसले किंवा अंतःकर्णेद्रियांना काही नाद ऐकू आला किंवा अंतरात्म्याला स्फूर्ती आली. हे दृष्यज्ञान-नादज्ञान-स्फूर्तीज्ञान विलोभनीय होते. मनमोहक होते. ते ज्ञानबीज मनःपटलावर लिहून घेतले गेले. बुद्धीने ते लक्षात ठेवले. इतरांना सांगितले. त्यांनाही त्याची प्रचिती आली. ज्ञानाचा प्रवास सुरु झाला. कालौघात माहिती संकलन गळून पडले. कारण त्याला चित्त बुद्धीचा आधार नव्हता. ज्ञानाचा प्रवास - मेदवृद्धीतून मुक्ती २०