पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।।श्रीरामसमर्थ।। ३. सूर्योपासनेतील सूर्यनारायण लेखाचे शीर्षक कोड्यात टाकणारे आहे. विचारांना चालना देणारे आहे. सूर्योपासना अनेक प्रकारच्या आहेत. आकाशात दिसणा-या एकाच सूर्याच्या विविध उपासना आपण करतो. सूर्यनारायण म्हणजेच आकाशातला सूर्य. एकाच सूर्याच्या अनेक पद्धतीने केलेल्या आराधना-उपासना याचे एकत्रित नामविशेष म्हणजे सूर्योपासना. एकच सूर्य विविध उपासनेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात प्रतित होतो त्या-त्या प्रतिकाची पूजा करणे हा या शीर्षकाचा मतितार्थ. सूर्यनमस्कारातील प्रत्येक आसन स्थितीमध्ये त्याचे असलेले आगळे-वेगळे वैशिष्ट्ये ।। एवंगुणविशेषणविशिष्टायां...।। स्पष्ट करणे हा या पुस्तकातील प्रत्येक पानाचा उद्देश. सूर्याची उपयुक्तता, कार्यविशेष कार्यपद्धती, अमर्याद आहे. कल्पनेच्या पलीकडची आहे. त्याचे अस्तित्त्व जिवाच्या असण्यासाठी निर्णायक आहे. तो नसेल तर सर्व सृष्टी निर्जिव होईल. जीव नसेल तर जाणिव नाही आणि जाणिव नाही म्हणजे जिवंत नाही. प्रत्येक सूर्यउपासना विराट सूर्याच्या एक एक दैवी गुणाचा विस्तार आहे. त्यातील एखाद्या गुणाचे वर्धन माझ्यामध्ये व्हावे म्हणून सूर्याची केलेली आराधना आहे. आंधळे एकत्र येवून हत्ती या प्राण्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात. तसाच काहीसा प्रकार या असंख्य सूर्योपासनेत होतो असे दिसते. आपणही या सूर्यनारायणाला अधिक चांगल्या पद्धतीने ओळखण्याचा प्रयत्न सूर्यनमस्कार साधनेतून करणार आहोत. या सूर्यतेजाला, ज्ञानसूर्याला आपल्या कवेत घेता येते का? त्याला आपले म्हणता येईल का ? तो आपल्याला आपले म्हणेल का? या प्रश्नांची उत्तरे त्याचीच उपासना करून त्याला विचारणार आहोत. भौतिकशास्त्रज्ञ सूर्याची माहिती मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. सूर्याच्या पृष्ठ भागावार होणारे बदल, त्या बदलाचा जीव आणि सृष्टी वर होणारा परिणाम यांचा सखोल शास्त्रीय अभ्यास सातत्याने सुरू असतो. पृथ्वीचे मेदवृद्धीतून मुक्ती १८