पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वांचे अभिनंदन करतो. दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर किमान १२+०१ सूर्यनमस्कार चार महिने जे घालत आहेत त्या सर्वांना सूर्यनमस्कार साधक म्हणून संबोधतो. तसे संस्थेचे प्रमाणपत्र त्यांना मिळेल. (चार महिन्यातील आपले अनुभव व पासपोर्ट आकाराचे दोन फोटोग्राफस् पाठवावेत.) सूर्यनमस्कार सरावामध्ये सातत्य ठेवा. संपूर्ण आरोग्य आनंदाचा अनुभव घ्या. अकाल मृत्यूच्या भयातून मुक्त व्हा. जगभर सूर्यनमस्कार प्रचार-प्रसार करण्यासाठी कार्यकर्ते व्हा. आपल्या या सर्व मनोकामना प्रभुरामचंद्रांनी पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना आपल्या अंतकरणातील आत्मारामाला करतो. सूर्यनमस्कार यज्ञ संकल्प या प्रकल्पाचे प्रायोजक माननीय उद्योजक श्री. श्रीरंग माणिकराव वाघ चिंचवड, पुणे तसेच त्यांचे सहकारी श्री. श्रीकांत मापारी, श्री. अभिजीत कोळपे, श्री. राजु शिवतरे, श्री. राजाभाऊ गोलांडे, श्री. जयंतराव कुलकर्णी, श्री. प्रितम भोसले तसेच प्रकल्प सल्लागार डॉ. श्री. शैलेंद्र होनराव, डॉ. श्री. विद्याधर कुंभार, डॉ. श्री. विजय सातव, श्री. श्रीपाद विद्वत आणि इतर कार्यकर्ते व स्वयंसेवक, सहभागी शाळा, कॉलेजेस, संस्था, आस्थापना, साधक या सर्वांच्या प्रेरणेतून हे लिखाण साकार झालेले आहे. या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. 'सूर्यनमस्कार यज्ञ संकल्पाचे' निमित्त नसते तर या पुस्तकाचे लिखाण प्रत्यक्षात झाले नसते असे मला वाटते. निवृत्ती नंतर मला सूर्यनमस्काराचे कार्य करण्यासाठी पाठबळ देणारी माझी धर्मपत्नी सौ. सुनंदा खर्डेकर, माझ्या कार्याचे साक्षिदार व मदतनीस श्री. राजेश दिमोठे, श्री. किरण तळपाडे आणि इतर अनेक सूर्यनमस्कार कार्यकर्ते यांचा पुस्तक प्रकाशनामध्ये सिंहाचा वाटा आहे. मोदित एंटरप्रायझेसचे श्रीयुत सुरेंद्र देशपांडे माझा संगणक नेहमी 'तैयार' स्थितीमध्ये ठेवतात. तसेच रविकिरण एंटरप्रायझेस व सर्कल प्रेस नासिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे देखणे पुस्तक साकारलेले आहे. श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य् केंद्र, नासिक या संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत श्रीराम शांताराम पुजारी, (Retd. Sr. Manager Design, HAL Nashik) सध्या काळाराम मंदिर नासिक चे पुजाधिकारी व श्री काळाराम संस्थानचे माजी विश्वस्त यांचे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त या सर्वांचा संपूर्ण कार्यामध्ये मेदवृद्धीतून मुक्ती १६