पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संकल्प केला. दुसरा यक्षप्रश्न ओघाने आला- 'लिखाणाला सुरूवात कोणत्या रोग- विकारांपासून करायची?' हा प्रश्न मनात जागता ठेऊन समाजात वावरलो. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, घरी - दारी, मित्र - नातेवाईक, सण-समारंभ, लग्न कार्य, बस- -ट्रेन, स्टँड-स्टेशन, रस्ते, दुकाने, बाजार, मॉल, यात्रा इत्यादी अनेक ठिकाणी जाणे झाले. तेथे वावरणाच्या जनसमुदायातील प्रत्येक व्यक्तीचे वय- वजन-आकार-हालचाल याची नोंद मन घेत होते. मेंदुच्या मेमरीमध्ये माहिती डाऊनलोड करीत होते. सर्वच वयोगटातील बहुसंख्य व्यक्ती पोटाचा वाढीव घेर, वजनदार चाल यामुळे स्मरणात साठविल्या जात होत्या. सरते शेवटी मन- -बुद्धी- स्मरणशक्ती यांच्या संमतीने सर्व रोगांचे आश्रयस्थान आणि अभयस्थान ठरलेले पोट यावर प्रथम लिखाण करण्याचे ठरविले. या पोटपुजेचे कारण- परिणाम- सूर्यनमस्कार उपचार याचा विस्तार मेदवृद्धीतून मुक्ती या पुस्तकात साक्षेपाने केलेला आहे. यच्चयावत सर्व रोग-व्याधी-विकार यांची विभागणी तीन प्रकारात करता येते १. पचनाचे विकार, २. श्वसनाचे विकार, ३. मन-बुद्धी - समरणशक्तीचे विकार. सूर्यनमस्कार साधनेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या श्वसनविकाराांना कसा प्रतिबंध करता येतो याचा विस्तार श्वसनविकारातून मुक्ती या पुस्तकामध्ये केलेला आहे. तसेच मन आणि मनोविकार यांच्यावर सूर्यनमस्काराचा परिणाम कोणत्या प्रकारे होतो याचा विस्तार ‘मन-बुद्धी - स्मरण' या पुस्तकात केलेला आहे. पचन-श्वसन-मज्जा संस्थेच्या विकारातून बाहेर पडायचे आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. पण यश येत नाही. अपयश येण्याची कारणे कोणती? ती दूर करण्याचे उपाय कोणते? प्रभावी उपाय व उपचार कसे करायचे ? या सर्वच प्रश्नांची उत्तरे ‘मेदवृद्धीतून मुक्ती' या पुस्तकात सापडतील असा विश्वास वाटतो. सापडले तर त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करा. सर्व रोगांचे मूळ उखडून टाका. मार्ग सापडला नाही तर संपर्क करा, समस्या कळवा. आपण उभयता त्यातून मार्ग काढू. त्याचा फायदा सर्वांनाच देऊ. सूर्यनमस्कार यज्ञ संकल्प यामध्ये सामील झालेल्या सर्व शाळा, संस्था, विद्यालये, महाविद्यालये, औद्योगिक संस्था तसेच संयोजक, कार्यकर्ते इत्यादी मेदवृद्धीतून मुक्ती १५