पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लक्षात आले. समास सातच्या सुरूवातीलाच आलेल्या दोन ओव्यांवर दृष्टी स्थीर झाली आणि माझ्या मनाचे माकडचाळे, मनातील द्वंद थांबले. रोगीयास औषध। सप्रचित आणी शुद्ध । तयासी होय आनंद। आरोग्य होतां ॥६॥ तैसा संसारे दुःखावला । त्रिविधतापे पोळला । तोचि येक अधिकारी जाला। परमार्थासी ॥७॥ या त्रिविध तापाचे स्फोटक दग्ध रसायन शरीरामध्ये ठासून भरलेले आहे. हे रसायन अशुद्ध-विकारी-विषारी - विनाशकारी आहे. त्याच्या मुळापर्यंत पोहचता आले, त्याचे मूलतत्व पकडता आले तर त्यामध्ये असलेल्या विनाशकारी रुद्र तत्वांचे भस्म करता येते. त्याचे रुपांतर जीवनदायी रसायनात करता येते. त्याचा उपयोग शरीर-मन-बुद्धीची शुद्धी-वृद्धी करण्यासाठी करून घेता येतो. आपले आरोग्य व आनंद शेवटच्या श्वासापर्यंत अबाधित ठेवता येते. प्रपंच यशस्वी होतो, परमार्थ मार्गातील अधिकार मिळतात. यासाठी सूर्यनमस्कार साधनेची दीक्षा आपल्या आद्य सद्गुरूंकडून म्हणजेच आत्मारामाकडून घेणे अपेक्षित आहे. दासबोधातील या दशकाचा हाच संदेश आहे. असा माझा ठाम विश्वास आहे. काय, शरीरातील हे अपायकारक रसायन का तयार होते, कसे तयार होते, त्याची उपद्रव क्षमता किती, आपल्या शरीर-मन-बुद्धी विरूद्ध लढण्याचे त्याचे सामर्थ्य त्यातील कच्चे दुवे कोणते या आणि इतर अनेक मुद्यांचा विचार करायचा आहे, युद्धाची रणनिती निश्चित करायची आहे. युद्धात जय मिळवायचा आहे. त्यासाठी शाश्वत सत्य, सनातन धर्मतत्व यांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे. सर्व विकल्प शंका-कुशंका यांना तिलांजली देऊन अर्जुनासारखे भगवंताशी एकरूप व्हायचे आहे. ।।करिष्ये वचनं तव ।। हे आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे बोधवाक्य / ज्ञानमंत्र आहे. त्याचा स्वीकार केला की सर्व विचार-विकार, गुण-अवगुण, सुख-दुःख, या सर्व भास-अभासांच्या पलीकडे मन झेपावते. सूर्यनारायणाची उपासना, सूर्योपासना / सूर्यनमस्कार साधना सुरू होते. त्रिविधतापांचे असंख्य प्रकार या तीन समासामध्ये आलेले आहेत. या सर्व तापातून मुक्त होण्याधसाठी सूर्यनमस्कार हा रामबाण प्रतिबंधात्मक उपचार आहे. हे तत्व प्रकाशमान झाले आणि रोग व सूर्यनमस्कार या विषयावर लिहिण्याचा मेदवृद्धीतून मुक्ती १४