पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता पंधरा मिनिटांमध्ये किमान तीन + १ ते कमाल अठ्ठेचाळीस+०१ अशी आहे. (२४+२४+०१) खेळाडू, कसरतपटू, धावपटू, पहिलवान तसेच पोहणे, शरीरसौष्ठव इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेणारे स्पर्धक यांनी आपल्या उद्दिष्टाप्रमाणे सूर्यनमस्कार संख्येत वाढ करणे अपेक्षित आहे. यासाठी प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घ्यावे. त्याच प्रमाणे व्याधी निवारणासाठी, मेदवृद्धी / वजन कमी करण्यासाठी आणि इतर रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊन सूर्यनमस्कार साधनेस सुरूवात करावी. सूर्यनमस्काराची संख्या वाढवितांना किंवा कमी करतांना ती हळू हळू करावी. सर्वसाधारणपणे कमित कमी तीन आठवड्याला तीन सूर्यनमस्कार वाढवावे. शरीर क्षमता क्षीण असेल, वय जास्त असेल, साधनेचे प्रथम वर्ष असेल तर तेरा आठवड्यानंतर तीन सूर्यनमस्कार वाढवावे. वय वर्षे ०९ ते १२ वर्षे १३ ते १५ वर्षे १६ ते ४० वर्षे ४१ ते ५० वर्षे ५१ ते ६० वर्षे ६१ ते १२० वर्षे सूर्यनमस्कार संख्या १२+०१ ते २४+१ (स्नायूंची लवचिकता व सूर्यनमस्काराची सवय पकडण्यासाठी) २४+१ चे दोन ते चार आवर्तन समंत्रक. शक्य असेल तेंव्हा मेदवृद्धीतून मुक्ती प्राणायामाचा सराव. २४+१ चे चार ते वीस आवर्तन समंत्रक किंवा क्षमते प्रमाणे. शक्य असेल तेंव्हा प्राणायामाचा सराव. २४+१ चे चार ते आठ आवर्तन समंत्रक किंवा क्षमते प्रमाणे. शक्य असेल तेंव्हा प्राणायामाचा सराव अधिक प्रमाणात. २४+१ चे दोन आवर्तन समंत्रक किंवा क्षमते प्रमाणे. प्राणायाम-योगासनांचा सराव अधिक प्रमाणत दररोज. २४ + १ चे एक आवर्तन ते ३+१ सूर्यनमस्कार समंत्रक किंवा क्षमते प्रमाणे. प्राणायाम-योगासनांचा सराव अधिक प्रमाणात दररोज. - टीप - अध्यात्मामध्ये सरासरी आर्युमान एकशे वीस वर्षेगृहित धरलेले आहे. ।। जय जय रघुवीर समर्थ ॥ १५४