पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीराम समर्थ ॥ २०. सूर्यनमस्कार कोणी आणि किती ? सूर्यनमस्कार कोणी आणि किती घालायचे हा व्यक्तीगत प्रश्न आहे. साधकाचे वय, सूर्यनमस्कार संख्या व होणारे फायदे असे गणिती भाषेतील वस्तुनिष्ट कोष्टक या साधनेत उपयोगी पडणार नाही. कारण वजन- उंची - बॉडीमास- वय, व्यवसाय, व्यसन, अयोग्य सवयी, रोग, व्याधी, अनुवंशिक विकार, शरीराचा आकार, सूर्यनमस्कार साधनेकडे बघण्याची दृष्टी याचाही प्रभाव सूर्यनमस्कार किती आणि कसे घातले जातात यावर होत असतो. त्यामुळे सूर्यनमस्कार व त्याचे परिणाम याचे समीकरण हे व्यक्तिनिष्ठ असते. सूर्यनमस्कार कोणत्या प्रकारे व किती वेळेत घातले जातात यावरही ही संख्या अवलंबून असते. संथ गतीने सूर्यनमस्कार शरीर शुध्दीसाठी घातले जातात. गतीयुक्त सूर्यनमस्कार शरीर वृद्धीसाठी घातले जातात. अशक्तपणा, आजारपण, काळजी - शोक-चिंता याचा परिणामही सूर्यनमस्कार घालण्याच्या क्षमतेवर होतो. शरीरातील स्नायू फार कामचुकार आहेत. त्यांच्या कलाने हळू हळू त्यांना कामाला लावायचे आहे. ९५% पेक्षा अधिक स्नायू सूर्यनमस्कारात कार्यरत झाल्यावर सर्व फायदे मिळण्यासाठी सूर्यनमस्कार संख्येला शून्य महत्त्व उरते. स्नायूंना किती वेळ लागेल हे आपल्या हातात नाही. आपण फक्त प्रयत्न करायचे. सबुरी-सातत्य-विश्वास ठेवायचा. साधकाशी सूचना साधना आणि फक्त साधना. एवढी एकच सूचना लक्षात ठेवायची. ही झाली सैद्धांतिक बाजू. व्यवहारिक भाषेत याचे उत्तर देतांना प्रत्येक सूर्यनमस्कार साधकाने तीन पायाभूत कौशल्ये प्राप्त केलेली आहेत असे गृहित धरलेले आहे.

  • एक कोणतेही स्नायूंचे किंवा इतर दुखणे सुरू न होता (विकोपाला न जाता)

सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे सुरू आहे.

  • दुसरे गृहीत आहे की तुम्ही सूर्यनमस्कार घालण्यास शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे

सक्षम आहात.

  • तिसरे गृहीत आहे की तुम्ही दररोज सूर्यनमस्कार घालता आहात. तुमची

मेदवृद्धीतून मुक्ती १५३