पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे आदिमाया (आ+ ई म्हणजे आदि + ईश्वर), जगदंबा, कुलदैवत, आराध्यदैवत, इष्टदैवत यांचे पूजन अर्चन सुरू होते. ध्यानामध्ये प्रगती होते. 'अष्टसिध्दी नव निधीके दाता' असे वरदान आपल्या कुलदेवतेकडून मिळते. सर्वमनोकामना सिध्द होतात. सूर्यनमस्कार साधनेची दीक्षा आत्मारामाने आपणाला दिलेली आहे. साधनेतील प्रचितीही तोच देणार आहे. तोच तुम्हाला समर्थ करणार आहे. त्या रामाचे दास व्हा. सौख्यकारी, शोकहर्ता बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या अंतःकरणात असलेल्या समर्थ रामदास स्वरूपाला विनम्र भावे वंदन करून आजचे सूर्यअर्घ्य त्यास सर्वभावे अर्पण करा. ॐ सहनाववतु। सहनौभुनक्तु । सहवीर्यं करवावहै। तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ कठोपनिषद हे परमेश्वरा आमच्या दोघांचे रक्षण कर. पालन पोषण कर. दोघांचे शक्ती व सामर्थ्य विकसित करून आमच्या पराक्रमाचे तेज सर्वत्र प्रकाशमान कर. दोघांमधील अद्वैतातून द्वेष- ईर्षा भाव नष्ट कर. आम्हा दोघांना शांती + आरोग्य + समृद्धी (शान्तिः शान्तिः शान्तिः) प्रदान कर. हे दोघे आहेत सर्व मी आणि सर्व तू, माझे तुझे, आतले-बाहेरचे, गुरु- शिष्य, शीव-शक्ती, परमात्मा - जीवात्मा..... मेदवृद्धीतून मुक्ती


॥जय जय रघुवीर समर्थ।। ।। महारुद्र हनुमान की जय। १५२