पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमरेतून खाली वाका. गुडघे जमिनीवर टेकवा. गुडघ्यावर उभे रहा. टाचेवर बसण्यासाठी शरीर खाली घ्या. (वज्रासन) चवड्यावर पार्श्वभाग टेकवा. खाली वाकून कोपर गुडघ्याच्या पुढे टेकवा. हात नमस्कार स्थितीमध्ये आणा. कपाळ हातावर टेकवा. श्वासोच्छ्वास नेहमी प्रमाणे ठेवा. संपूर्ण लक्ष कृतीकडे ठेवा. स्वाधिष्ठान चक्राचे सर्व स्नायू हळू हळू मोकळे करा. या भागातील सर्व स्नायूंचा तणाव काढून टाका. स्नायू मोकळे होता आहेत याचा अनुभव घ्या. याच पध्दतीने कंबर, पाठ, खांदे, मान, डोके यांचा ताण मोकळा करा. मन एकाग्र करून समर्पण भावाने गुरूवंदन श्लोक म्हणा. आपल्या आईचा हसरा आनंदी चेहरा मनःपटलावर बघा. गुरूवंदन श्लोक व सर्व स्नायू मोकळे ठेवण्याची कृती आणखी दोन वेळा करा. प्रत्येक वेळेस स्नायू अधिक ताणमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आईचा हसरा आनंदी चेहरा मनःपटलावर तसाच ठेवा. दीर्घश्वास घेऊन तळवे जमिनीवर टेकवा. श्वास घ्या तळवे जमिनीवर दाबा, खांदे वर उचला. कोपर सरळ करा. श्वास घ्या पंजाने जमीन खाली रेटा कंबर वर उचला. गुडघे सरळ करा. दीर्घश्वास घ्या. थोडं थांबा. सावकाश उभे रहा. या आसनातून मी तुम्हाला नमस्कार केला. तुम्ही मला केलेला नमस्कार स्वीकारला. तो तुमच्या गुरूमाऊलीकडे सुपूर्त केला. प्रत्येकाचे जीवनविश्व आपली आई असते. आई हाच सर्वांचा प्रथम गुरू असतो. त्याचे प्रथम ध्यान करा. यातूनच मेदवृद्धीतून मुक्ती १५१