पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडं थांबा. दिलेला ताण मोकळा करा. हात तसेच ठेवा. काया-वाचा- जीवे - भावे सूर्यनारायणाला नमस्कारपूर्वक प्रार्थना करा. शरीराला अधिक प्राणतत्त्वाचा पुरवठा करणारी बारा आसनांची चढती भांजणी पूर्ण झाली. पुढील सूर्यनमस्काराचे पहिले आसन करतांना या दोन आसनात मिळणाऱ्या प्राणऊर्जेमधील तर-तम भाव लक्षात घ्या. समर्पणाचा श्लोक आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते ॥ नमोधर्मविधानाय नमस्ते कृतसाक्षिणे नमः प्रत्यक्षदेवाय भास्कराय नमोनमः || अनेन सूर्यनमस्काराख्येन कर्मणा भगवान् श्रीसविता सूर्यनारायणः प्रीयताम् न मम ।। ।।हरिः ॐ तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु ।। अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम् । सूर्यपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम् ।। बैठा अष्टांगनमस्कार मेदवृद्धीतून मुक्ती समर्पण- जगातील सर्व समर्थभक्त व सूर्यनमस्कार साधक यांना साष्टांगभावे नमस्कार. १५०