पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमंत्र - ॐ भास्कराय नमः - प्रणामासन आणि मुद्रा उद्देश प्रत्येक आसन वचसा-मनसा- दृष्ट्या करायचे आहे. मेरुदंडाची लवचिकता वाढविणे. - अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायुंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण - दाब पडणार नाही याची काळजी घेणे. दोन्ही हात जुळवून कपाळावर ठेवणे. दोन्ही पंजे दाबून धरणे, मान पाठीमागे ढकलणे, कोपर खांद्याच्या सरळ रेषेत घेणे, छातीवर पडलेला ताण स्वीकारणे. आसन करतांना १. श्वास सर्वसाधारण, २. अनाहत - विशुद्ध-आज्ञा चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी अंतर्यामी लावणे, ४. खांदे-म दे-मान- छातीवर पडलेला ताण स्वीकारणे. काया-वाचा-जीवे-भावे परमतत्त्वाशी एकरूप होणे. आरोग्य लाभ - प्रणामासन-ऊर्ध्वहस्तासन - अश्वसंचालनासन (अनाहत- अनाहत चक्र विशुद्धचक्र-आज्ञाचक्र) प्रमाणे. प्रणामासन आणि मुद्रा कृती- नमस्कार स्थितीमध्ये हात घेऊन कपाळावर ठेवा. श्वासोच्छवास सर्वसाधारणपणे चालू ठेवा. हाताचे पंजे एकमेकांवर पक्के दाबून धरा. कोपर खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करा. जेवढे शक्य होईल तेवढे डोके मागे ढकला. मान व छातीवर पडणारा ताण स्वीकारा. विशुद्धचक्र हा मध्यभाग ठेवून आज्ञाचक्र व अनाहतचक्र यांची कमान करा. मेदवृद्धीतून मुक्ती प्रणामासन व नमस्कार मुद्रा १४९